Asmi dominates the fancy dress competition
नवरात्रौत्सवनिमित्त सावंतवाडी शहरातील विविध नवरात्रौत्सव मंडळातर्फे आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या लहान गटात आरपीडी हायस्कुलच्या अस्मि प्रवीण मांजरेकर हिचा दबदबा कायम राहिला आहे. भटवाडी, माठेवाडा व बाजारपेठ या तिन्ही मंडळाच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिन्ही स्पर्धेत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पत्नी आवली हिची वेशभूषा तिने साभिनय सादर केली होती. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ माठेवाडा सावंतवाडी, बाजारपेठ मित्रमंडळ सावंतवाडी, ओंकार नवरात्रौत्सव मंडळ भटवाडी सावंतवाडी या तिन्ही मंडळाच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या लहान गटात तिने प्रथम क्रमांक पटकावला. माठेवाडा स्पर्धेत 2501रु व दोन हजार र्य. ची आकर्षक भेटवस्तू, बाजारपेठ स्पर्धेत 2501 रु व आकर्षक स्मृतीचिन्ह तर भटवाडी येथील स्पर्धेत 1001 रु व प्रशस्तीपत्रक तिला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माठेवाडा स्पर्धेत अस्मीने जेतेपदाची हॅट्ट्रिक खेली आहे