Asmi Manjrekar honored by former Union Minister Suresh Prabhu
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त अटल प्रतिष्ठान सावंतवाडी तर्फे आयोजित केलेल्या खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त आरपीडी हायस्कुल सावंतवाडी च्या अस्मि प्रवीण मांजरेकर हिला प्रभू यांच्या हस्ते पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्रा प्रगती रानडे (माहीम -मुंबई ), द्वितीय साईशा विठ्ठल केळजी ( मातोंड ), उत्तेजनार्थ समिहन मंगेश काळे (पणजी गोवा ) यांनी पटकवला. वक्तृत्व स्पर्धेसाठी कोरोना काळात मला आलेले सुखद अनुभव…. हा विषय होता. यावेळी बोलताना प्रभू म्हणाले, अटल प्रतिष्ठान हे समाजात प्रतिष्ठा मिळविलेले प्रतिष्ठान आहे. समाजात या संस्थेचे अटल स्थान आहे. या संस्थेचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे गौरोदगार प्रभू यांनी काढले. यावेळी युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ भोसले, प्रतिष्ठान चे अध्यक्ष ऍड नकुल पार्सेकर, डॉ राजेश नवांगुळ, अटल प्रतिष्ठान च्या व्यवस्थापिका सौ रश्मी कार्लेकर, प्रधानचार्या विजया रामाणे, खजिनदार लिंगवत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजशेखर कार्लेकर यांनी केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी