Tarun Bharat

उड्डाणपुलाच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण

वाहतुकीस लवकरच खुला होण्याची शक्यता

प्रतिनिधी /बेळगाव

तिसरे रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले असून डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी, विद्युत दिवे बसविण्याचे काम आणि फुटपाथच्या कामासह उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आटापिटा सुरू आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल लवकरच खुला होण्याची शक्मयता आहे.

शहरातील विविध रेल्वेफाटकांवर उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. यापूर्वी तीन ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली असून तिसरे रेल्वेगेट येथे चौथे उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत सर्वाधिक वेळ तिसऱया रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाच्या उभारणीस लागला आहे. शहरात आणखी तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारणीचा प्रस्ताव रेल्वे खात्याचा आहे. पण तिसऱया रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने नव्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले नाही.

तिसऱया रेल्वेफाटकावर वाहनांची गर्दी होत असल्याने याठिकाणी उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. कोरोना आणि विविध कारणांमुळे उड्डाणपुलाच्या उभारणीस विलंब झाला आहे. 15 दिवसांत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती कंत्राटदाराने दिली होती. पण आतापर्यंत डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी, पथदीप बसविणे, फुटपाथ आणि अन्य उर्वरित कामे सुरू आहेत. त्यामुळे आणखी पंधरा दिवसांचा अवधी लागण्याची शक्मयता आहे. सध्या पुलाशेजारील रस्ता खराब झाला असून उड्डाणपूल खुला करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

Related Stories

वाहतूक कोंडी-पार्किंग समस्येवर तातडीने तोडगा काढा

Amit Kulkarni

गोवावेस बसवेश्वर सर्कलमध्ये साचले पावसाचे पाणी

Amit Kulkarni

टिळकवाडी येथे बेकायदा दारू जप्त

Patil_p

इतके बळ कोठून मिळते?

Patil_p

बिबटय़ासाठी आता काय करावे?

Patil_p

कचरा उचल करण्यासाठी घरोघरी जाणार ई-ऑटो टिप्पर

Patil_p