सोमवारी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते झाले उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून गेलेल्या कचेरी रोडचे डांबरीकरण होणार असून त्याचे उद्घाटन सोमवारी आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
बऱ्याच दिवसांपासून हा रस्ता करावा अशी मागणी होत होती. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता करावा अशी मागणी होत होती. त्यानुसार आता रस्त्याचे लवकरच डांबरीकरण होणार आहे.
यावेळी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.