Tarun Bharat

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; मागील २४ तासात ८ जणांचा मृत्यू

Advertisements

ऑनलाईन तीळ/तरुण भारत

आसाममध्ये (Assam Floods) संततधार पावसामुळे दिवसेंदिवस पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. गेल्या २४ तासात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ३१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेल्या म्हणीनुसार, कछारच्या सिलचर क्षेत्राचा मोठा भाग गेल्या ११ दिवसांपासून पाण्याखाली आहे. त्यामुळे येथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे १५९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील २६ जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्तांची संख्या ३१.५४ लाख झाली आहे. एक दिवसापूर्वी पूरग्रस्तांची संख्या २४.९२ लाख होती. ब्रम्हपुत्रा, बेकी, कोपिली आणि कुशियारा नद्यांना पूर आल्याने धोक्याची पातळी ओलांढली आहे. मात्र, इतर अनेक नद्यांची पाणीपातळी कमी होत आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उपायुक्तांसोबत आभासी बैठक घेतली आणि पूरग्रस्तांना मदत देण्याचे निर्देश दिले.

सीआरपीएफ कॅम्पमध्ये शिरले पुराचे पाणी
आसाममध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सीआरपीएफच्या छावण्यांमध्ये पाणी शिरले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अजून ३-४ दिवस पाऊस पडणार आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून कॅम्प रिकामा करण्यात येत आहे.

अरुणाचलमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १८ जणांचा मृत्यू
अरुणाचल प्रदेशात पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे. नुकतेच पापम परे जिल्ह्यात आणखी एक मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान, एनडीआरएफच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नीमा ताशी यांनी सांगितले की, पुरात बुडालेल्या लोकांचा शोध घेत असताना बळीजानमधील चकमा कॅम्प-1 येथील ढिगाऱ्याखालून २७ वर्षीय महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मोमिता चकमा असे या महिलेचे नाव आहे. यापूर्वी, इटानगरला लागून असलेल्या पापुम परे जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे पाच आणि पश्चिम सियांग जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ईशान्येकडील राज्य पुरबाधित झाली आहेत. तसेच पूर आणि भूस्खलन झाल्याने अनेक ठिकाणचा संपर्क तुटला आहे.

मणिपूर : भूस्खलनात १४ ठार
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वे बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनात १४जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच स्थानिक लोकांसह लष्कराचे सुमारे ६० लोक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुपुल यार्ड रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी बुधवारी रात्री ही घटना घडली. बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी ट्विट केले की तुपुलमधील भूस्खलनाच्या घटनेचे मूल्यांकन करण्यासाठी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. ब

Related Stories

कॉमेडियन राजू श्रीवास्तवब्रेनडेड स्थितीत : प्रकृती चिंताजनक

Amit Kulkarni

खनिज कायदा दुरुस्ती अध्यादेशाला मंजुरी

Patil_p

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला; 150 मीटरचे भुयार BSF कडून उद्ध्वस्त

datta jadhav

राजस्थानच्या मंत्र्याचा पुत्र फरार

Patil_p

पाकिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वाराचे मशिदीत रूपांतर करण्याचा प्रयत्न

datta jadhav

निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी

Rohan_P
error: Content is protected !!