Tarun Bharat

आसाम आणि त्रिपुरामध्ये महापुराचा हाहाकार, आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आसाम (assam) आणि त्रिपुरामध्ये (tripura) मुसळधार पावसामुळे पूर (flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या आसाम आणि त्रिपुरामधील पूर परिस्थिती बिकट झाली आहे. या भीषण पुरामुळे आतापर्यंत ५५ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी शनिवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) यांना फोन करून राज्यातील सध्याच्या पूरस्थितीची माहिती घेतली आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना होत असलेल्या अडचणींबाबतही मोदींनी चिंता व्यक्त केली. या वर्षी आसाममधील २८ जिल्ह्यांमध्ये १८.९५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे बाधित झाले आहेत. राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला आहे.

आसामच्या होजाई जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली, जहाजावरील तीन मुले बेपत्ता झाली तर २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामपूर गावातून २४ गावकऱ्यांचा एक गट सुरक्षित स्थळी जात असताना रायकोटा परिसरात बुडलेल्या वीटभट्टीवर त्यांची बोट उलटली. यामध्ये ३ मुले बेपत्ता झाली असून २१ जणांना वाचविण्यात यश आले आहे.

कोपिली नदीला पूर आल्याने मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील ५५ हजाराहून अधिक लोक बाधित झाले आहेत. तसेच या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या पुराचाही मोठा फटका बसला होता. जिल्ह्यातील ४७ मदत छावण्यांमध्ये एकूण २९,७४५ लोकांनी आश्रय घेतला आहे.

पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील सदर उपविभागात, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात २ हजाराहून अधिक लोक बेघर झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. यासर्वांनी २० मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही संसर्ग

Patil_p

मणिपूरमध्ये सरकार संकटात

Patil_p

लष्करी रुग्णालये सर्वसामान्यांसाठी खुली पंतप्रधानांच्या भेटीत लष्करप्रमुखांची माहिती

Amit Kulkarni

भर कार्यक्रमात खासदाराने लगावली कुस्तीपटूच्या कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

datta jadhav

डिस्चार्जचा आकडा पोहोचला 60 हजारांवर

Patil_p

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाग्रस्तांची संख्या 394 ने वाढली

prashant_c