Tarun Bharat

अमेरिकेत भारतीय इंजिनियरची हत्या

सॉफ्टवेअर इंजिनियर मूळचा तेलंगणातील : कुटुंबीयांनी भारत सरकारकडे मागितली मदत

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

Advertisements

अमेरिकेच्या मेरीलँड प्रांतात एका एसयुव्हीमध्ये जखमी आढळून आलेल्या भारतीय वंशाच्या 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. 25 वर्षीय साईचरण नक्का हा कारमध्ये जखमी आढळून आल्यावर त्याला मेरीलँडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले हेते. नक्का हा तेलंगणाच्या नलगोंडा जिल्हय़ाचा रहिवासी होता.

26 वर्षीय नक्कावर रविवारी संध्याकाळी एका अश्वेत व्यक्तीने गोळीबार केला होता. अमेरिकेत असलेल्या साईचरणच्या मित्रांनी त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली आहे. मेरीलँडच्या कॅटन्सव्हिलनजीक स्वतःच्या कारमधून प्रवास करत असलेल्या साईचरणची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली आहे. एका मित्राला विमानतळावर सोडून घरी परतत असताना हा प्रकार घडला होता.

सॉफ्टवेअर इंजिनियरच्या डोक्याला गोळी लागली होती. गोळी लागल्यावर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सॉफ्टवेअर इंजिनियर मागील दोन वर्षांपासून मेरीलँडच्या बाल्टीमोर शहरात एका कंपनीसोबत काम करत होता.

मुलाच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या त्याच्या  आईवडिलांनी भारत सरकार तसेच तेलंगणा सरकारकडे नक्का साईचरणचा मृतदेह घरी आणण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.

Related Stories

इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांचे निधन

tarunbharat

मेक्सिकोमध्ये 15,873 नवे कोरोना रुग्ण,1235 मृत्यू

Rohan_P

कमला हॅरिस यांना जीवे मारण्याची धमकी

datta jadhav

अमेरिकेचे एन-35 विमान दुर्घटनाग्रस्त; 7 जवान जखमी

datta jadhav

हवा, पाणीबदलाचा परिणाम होतोय मारक, 44 आरोग्य समस्या

Patil_p

भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या विमानांवर निर्बंध

datta jadhav
error: Content is protected !!