Tarun Bharat

शिंजो आबे यांची भरसभेत हत्या

Advertisements

जपानला मोठा धक्का, माजी सैनिकाकडून गोळीबार, भारतही शोकमग्न, एक दिवस दुखवटा जाहीर

टोकिओ / वृत्तसंस्था

जपानचे माजी पंतप्रधान आणि भारताचे सच्चे मित्र शिंजो आबे यांची एका कार्यक्रमात छातीत गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. ते 67 वर्षांचे होते. त्यांचा मारेकरी माजी नौसैनिक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जपानमधील ‘नारा’ या शहरात जाहीर कार्यक्रमात ते भाग घेत असताना स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर मागून गोळय़ा झाडण्यात आल्या. छातीतून गोळी आरपार झाल्याने ते कोसळले. त्यांना त्वरेने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांनी काहीकाळ मृत्यूशी झुंज दिली. तथापि, साधारणतः सहा तासांनंतर त्यांचा मृत्यूशी संघर्ष अपयशी ठरला. भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अधिकृतपणे त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली.

EDS PLS TAKE NOTE OF THIS PTI PICK OF THE DAY:::In this image from a video, Japan’s former Prime Minister Shinzo Abe, center, is attended on the ground in Nara, western Japan Friday, July 8, 2022. Abe was shot and critically wounded during a campaign speech Friday. He was airlifted to a hospital but officials said he was not breathing and his heart had stopped. AP/PTI(AP07_08_2022_000056B)(AP07_08_2022_000242B)

या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्वरित कृती करुन तेत्सुया यामागामी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, अधिक माहिती देण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला. अधिक चौकशी सुरु असून लवकरच हत्येचे कारण अधिकृतरित्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हत्या एका घरगुती बनावटीच्या गनने करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधान मोदींना दुःख

शिंजो आबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गाढ मैत्री होती. या दोन्ही नेत्यांच्या पुढकाराने भारतात बुलेट ट्रेन प्रकल्प साकारला जात आहे. आबे यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारत आणि जपान एकमेकांच्या बरेच जवळ आले. आबे यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान मोदींनी तीव्र दुःख प्रकट केले. आपल्या संदेशात त्यांनी आबेंना जवळचा मित्र म्हणून संबोधले आहे. जगातील अनेक नेते मान्यवरांनी त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हत्या का झाली ?

शिंजो आबे हे शांत आणि सौम्य स्वाभावाचे म्हणून ओळखले जाते. त्यांची हत्या का झाली हे अद्यापही एक गूढ आहे. याचा तपास सुरु असून लवकरच त्याचा छडा लागेल, अशी माहिती जपानच्या प्रशासनाने दिली आहे. त्यांच्या हत्येच्या कारणांचा कसोशीने तपार करण्यात येणार आहे. त्यांचा मारेकरी यामागामी याच्या म्हणण्यानुसार त्याचा आबे यांच्या राजकीय भूमिकेशी मतभेद नव्हता. मग त्याने हत्या का केली, याची चौकशी आता सुरु आहे.

गणतंत्र दिनाचे मुख्य अतिथी

2014 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि रालोआ यांची सत्ता भारतात आल्यानंतर आबे यांना त्यावर्षीच्या गणतंत्रदिनी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ते ही या आमंत्रणाचा स्वीकार केला होता. गणतंत्रदिनी प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित राहिलेले ते जपानचे प्रथमच पंतप्रधान होते.

.

चीनच्या सोशल मीडियावर आनंद

शिंजो आबे यांची हत्या झाल्याचे वृत्त पसरताच जगात इतरत्र दुःखाची भावना असताना चीनच्या सेशल मीडियावर काही लोकांनी जाहीर आनंद व्यक्त केला. चीनचा शत्रू नाहीसा झाला याचा आम्हाला अतीव आनंद होत आहे, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावरुन पाठविण्यात येत होते. चीन आणि जपान यांचे संबंध इतिहासकाळापासूनच बिघडलेले आहेत. त्याचे हे प्रत्यंतर होते.

दुःखासमवेत आश्चर्याची भावना

शिंजो आबे यांच्या हत्येचे वृत्त जगात पसरताच दुःखासमवेत आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होते. कारण जपानमध्ये अमेरिकेप्रमाणे गन संस्कृती फोफावलेली नाही. अगदी क्वचित त्या देशात अशाप्रकारे गोळय़ा झाडून हत्या केल्या जातात. सर्वसाधारणपणे जपानी नागरिक हा हिंसक प्रवृत्तीचा नसून शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जातो. जपानमध्ये दहशतवादी किवा अतिरेकी प्रवृत्तीच्या संघटना किंवा व्यक्ती जवळपास नाहीत अशी स्थिती असताना एका माजी पंतप्रधानाची अशा प्रकारे दहशतवादी कृत्याला शोभेल अशी हत्या घडल्याचे जपानमधील आणि जगभरातील लोकांना मोठेच आश्चर्य वाटत आहे. तपास यंत्रणांसाठीही हा आश्चर्याचा धक्का मानला जात असून संशयिताची कसून चौकशी सुरु आहे.

चार तास आधीच ठरला कार्यक्रम

नारा या शहरात झालेल्या या कार्यक्रमात आबे यांचे भाषण केवळ चार तास आधी ठरविण्यात आले होते. ही एक प्रचारसभा होती. या सभेला गर्दीही फार मोठी नव्हती. तसेच या सभेला आबे उपस्थित राहणार असल्याची प्रसिद्धी करण्यात आली नव्हती. तरीही मारेकऱयांना त्यांच्या या कार्यक्रमाची माहिती कशी मिळाली तो एवढय़ा तयारीने येथे कसा येऊ शकला, याचेही गूढ उकलावे लागणार आहे.

चीनचा हात शक्य ?

शिंजो आबे यांच्या हत्येत चीनचा हात आहे का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. मात्र चौकशी यंत्रणांनी यासंबंधी अद्याप मौन पाळले आहे. तसेच अधिकृतरित्या चीनच्या संबंधांवर भाष्य करण्यात आलेले नाही. तथापि, इतिहासकाळापासून चीन आणि जपान यांचे संबंध विळय़ा-भोपळय़ाचे आहेत. 19 व्या शतकात जपानने चीनवर हल्ला करुन त्याचा प्रदेश बळकाविला होता. याचा राग चीनच्या मनातून आजही गेलेला नाही. त्यामुळे चीनच्या हस्तकांनी जपानमध्ये प्रवेश केला आहे का, असा प्रश्नही या हत्येच्या संदर्भात उपस्थित होत आहे.

चारवेळा भारतभेट

शिंजो आबे हे जपानचे सर्वात प्रदीर्घ काळ पंतप्रधानपदी राहिलेले नेते आहेत. भारतासंबंधी त्यांना विशेष आपुलकी होती. त्याच्या 9 वर्षांच्या पंतप्रधानपद काळात त्यांनी चारवेळा भारताचा दौरा केला. चारवेळा भारताचा दौरा करणारे ते जपानचे प्रथमच पंतप्रधान होते. 2006-07 या त्यांच्या सत्ताकाळात त्यांचा पहिला भारत दौरा झाला होता. त्यावेळी त्यांनी भारताच्या संसदेत भाषण केले होते. त्यानंतर जानेवारी 2014, डिसेंबर 2015 आणि सप्टेंबर 2017 असे त्यांचे चारवेळा भारत दौरे झाले असून त्यातील तीन पंतप्रधान मोदींच्या काळातले होते.

हृदयद्रावक घटनाक्रम

ड शिंजो आबे यांचे जाहीर सभेतील भाषण संपल्यानंतर त्यांच्यावर मागून गोळय़ा झाडल्यात आल्या. ते जपानच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीचा प्रचार करत होते. त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.

ड त्यांच्या पाठीतून दोन गोळय़ा आत शिरल्यानंतर ते कोसळले. मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. त्वरित त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यग्नात आली. ते साधारणतः 6 तास जिवंत होते. पण वाचविण्यात अपयश आले.

ड गोळय़ा पाठीतून आत शिरल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आपला हात छातीवर दाबून ते खाली कोसळले असे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले. जागीच त्यांच्या छातीला मर्दन करण्यात आले. पण उपयोग झाला नाही.

ड काही जणांच्या मते त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांच्या हृदयाचे ठोके थांबले होते. त्यांच्याकडून काही प्रतिसादही मिळत नव्हता. कदाचित त्यांचा मृत्यू त्याचवेळी झाला असावा, पण अधिकृत वृत्त यापेक्षा भिन्न आहे.

ड त्यांना रुग्णालयात घेऊन गेलेल्या साहाय्यता पथकातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मानेच्या उजव्या बाजूतून रक्तस्राव होत होता. तसेच त्यांना अंतर्गत रक्तस्राव मोठय़ा प्रमाणात होत होता, ते बेशुद्धावस्थेत होते.

ड रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना त्वरित मृत घोषित करण्यात आले नाही. त्यांच्यावर शेवटच्या क्षणापर्यंत उपचार करुन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, अंतिमतः डॉक्टरांनाही हार मानावी लागली.

ड मारेकऱयांने त्यांच्यावर गोळय़ा झाडल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी, त्याला अटक करण्यासाठी फारसे प्रयत्न पोलिसांना करावे लागले नाहीत. मारेकऱयाच्या या कृतीमुळे हत्येचे गूढ अधिक वाढले आहे.

ड नारा येथे त्यांच्या भाषणाचा कार्यक्रम आधीपासून ठरलेला नव्हता. तो अगदी ऐनवेळी ठरविण्यात आला. तरीही मारेकऱयाला त्याची माहिती मिळाली याचे साऱयांनाच आश्चर्य वाटत आहे. तसेच ही चिंतेची बाबही मानण्यात येत आहे.

ड ते त्यांच्या लिबरल डेमॉपेटिक पक्षाच्या सभेत आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी भाषण करण्यासाठी आले होते. या पक्षानेही त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंबंधी आश्चर्य व्यक्त केले असून तपासाअंतीच हे गूढ उकलणार आहे.

Related Stories

नौकेच्या मदतीने दुमजली घराचे स्थलांतर

Patil_p

नववर्षाच्या प्रारंभी युक्रेनवर रशियाकडून आक्रमण

Patil_p

पहिल्यांदाच मानवी शरीरात धडधडले डुकराचे हृदय

Patil_p

बेलारुस-पोलंड वाद, युरोप युद्धाच्या उंबरठय़ावर

Patil_p

प्लाझ्मा थेरपीद्वारे होणार कोरोना रुग्णांवर उपचार : डोनाल्ड ट्रम्प

datta jadhav

पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!