Tarun Bharat

लष्करी जवानाकडून दोन सहकाऱयांची हत्या

Advertisements

हल्लेखोर फरार ः मृतांमध्ये महाराष्ट्र-लातूरमधील एकाचा समावेश

पठाणकोट / वृत्तसंस्था

पंजाबमधील पठाणकोट जिह्यातील मिरथल कॅन्टोनमेंटमध्ये सोमवारी एका जवानाने अंदाधुंद गोळीबार करत दोन वरिष्ठ अधिकाऱयांची हत्या केली. या घटनेनंतर छावणीत गोंधळ उडाल्यानंतर हल्लेखोर जवान फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असून अधिक तपास केला जात आहे. कॅन्टोनमेंट क्षेत्रात ही घटना घडल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने याप्रकरणी कसून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. गोळीबार आणि हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हवालदार गौरी शंकर हट्टी, रा. नीर बोएपूर, जिल्हा हुगळी, पश्चिम बंगाल आणि सूर्यकांत शेषराव तेलंगी, रा. बडेगाव, जिल्हा लातूर, महाराष्ट्र अशी मृतांची नावे आहेत. हल्लेखोर आरोपी गार्डमॅन शिपाई लोकेश कुमार ध्रुव हा छत्तीसगडमधील बलोदा बाजार येथील रहिवासी आहे. याप्रकरणी नांगलभूर पोलीस ठाण्याचे पोलीस तपासात गुंतले आहेत. पोलिसांनी गोळीबार करणाऱया जवानाविरुद्ध खून आणि शस्त्रास्त्र कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच लष्कराने घटनास्थळी आपल्या स्तरावर तपास सुरू केला आहे. गोळीबारामागचे कारण शोधले जात आहे. पोलीस आणि प्रशासनाचे वरि÷ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हवालदार गौरी शंकर, सूर्यकांत तेलंगी आणि आरोपी लोकेश कुमार हे तिघेही एकाच बॅरेकमध्ये राहतात. एकावेळी 3/3 जवान डय़ुटीवर असतात. रविवार-सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ते डय़ुटीवर होते, असे नायक पन्नी राजू याने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले. आरोपी लोकेश बॅरेकच्या बाहेर पाळत ठेवत होता. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ते हवालदार तेलंगी आणि गौरीशंकर यांच्यासोबत बराकीत पोहोचले आणि झोपले. अचानक दोन वाजता बंदुकीच्या गोळय़ांचा आवाज आला. लोकेशच्या हातात इंसास रायफल असल्याचे त्याने पाहिले. त्याचवेळी हवालदार तेलंगी आणि गौरीशंकर रक्ताच्या थारोळय़ात पडले होते. यादरम्यान बाकीचे जवानही उठल्यानंतर आरोपी रायफल सोडून पळून गेला. त्यांनी जखमींना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

उशाखालून चावी चोरून मिळविली रायफल

आरोपीने गोळीबार केलेली इंसास रायफल हवालदार गौरी शंकर यांच्या नावाने जारी करण्यात आली होती. रात्री गस्तीवरून परत आल्यावर हवालदार गौरी शंकर यांनी सर्व हत्यारे बॅरेकच्या कपाटात ठेवली आणि कुलूप लावून चावी उशीखाली ठेवून झोपले. आरोपी लोकेशने गुपचूप उशीखालील चावी काढून बॅरेक उघडली आणि रायफलने गोळीबार केला, असे एका लष्करी अधिकाऱयाने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले.

4 महिन्यांपूर्वी बीएसएफ तळावरही घटना

सुमारे चार महिन्यांपूर्वी पंजाबमधील अमृतसर जिह्यातील बीएसएफ (बॉर्डर सिक्मयुरिटी फोर्स) मुख्यालय खासा येथे अशीच घटना घडली होती. बीएसएफचे कॉन्स्टेबल सत्यप्पा एस. के. यांनी मेसमध्ये गोळीबार केला होता. या गोळीबारात चार जवान हुतात्मा झाले असून एक जण गंभीर जखमी झाला होता. गोळीबार करणाऱया सत्यप्पाने नंतर स्वतःवरही गोळी झाडली. कॉन्स्टेबल सत्यप्पा हे मानसिक त्रासाने त्रस्त असल्याचे तपासात समोर आले असून त्यांच्या बॅगेत नैराश्याच्या गोळय़ाही सापडल्या होत्या.

Related Stories

राष्ट्रपती निवडणुकीबाबत आतापासूनच विचारमंथन

Amit Kulkarni

बुद्धदेव भट्टाचार्य यांची प्रकृती बिघडली

Patil_p

ममता बॅनर्जी-शरद पवार भेटीवर संजय राऊत म्हणतात…

Abhijeet Shinde

ग्रामीण भागातील संसर्ग रोखा!

Patil_p

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

Patil_p

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक

tarunbharat
error: Content is protected !!