Tarun Bharat

शेतकऱ्य़ांच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या पायऱ्यावर पुन्हा ‘मविआ’चं आंदोलन,हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी

Assembly Monsoon Session Live :शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशीच विरोधकांनी सत्त्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुद्यावरून धारेवर धरलं होतं. तर मोहित कंबाज यांच्या ट्विट वरून मविआ नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काल विधानभवनात राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र त्यानंतर दुपारी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. दरम्यान आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशीच्या कामकाजा आधीच विरोधकांनी बैठक घेतली आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यावर हे आंदोलन सुरु आहे. ‘५० खोके, एकदम ओक्के’ अस म्हणत हातात पोस्टर घेऊन विरोधकांनी घोषणाबाजी केली आहे. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांनी मागणी केली आहे.

दरम्यान, सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय.
रश्मी शुक्लांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर 10 मिनिटांनी मोहित कंबोज फडणवीसांच्या बंगल्यावर गेले. रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांची फडणवीस यांच्याशी संयुक्त भेट झाली नाही. पण, या भेटीगाठींमुळं राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.

थोरात म्हणाले, सागर बंगल्यात (Sagar Bungalow) वॉशिंग मशीनचं (Washing machine) काम चालत असेल, म्हणून शुक्लांनी फडणवीसांची भेट घेतली असावी, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावलाय. अजून बरंच काही होणार आहे. आमचे लोक त्यांना प्रत्युत्तर देतील. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वावरही भाष्य केलं.

Related Stories

कर्नाटक हिजाब बंदी : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता

Archana Banage

पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा: आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत जाहीर

Abhijeet Khandekar

हिमाचल प्रदेश : 4 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार सर्व शाळा

Tousif Mujawar

अभिनेत्री तब्बुचा अपघात; ‘भोला’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना दुखापत

Kalyani Amanagi

मुंबईत चाचणीसाठी मेट्रो धावली ; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील

Archana Banage

महाराष्ट्रात एका दिवसात 51,457 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar