Assembly Speaker Rahul Narvekar welcomed by NCP
विधानसभेचे अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सावंतवाडीतील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर उपस्थित होते. प्रवीण भोसले यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी नार्वेकर यांच्याकडे केली. नार्वेकर यांनी यासंदर्भात मंत्री अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मल्टीस्पेट स्पेशलिटी हॉस्पिटलचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल अशी ग्वाही दिली. उत्तमस्टील सह अनेक उद्योगांना शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या परंतु त्या जमिनीचा उपयोग करण्यात आलेला नाही, हॉटेल उद्योजक नाही, जमिनी देण्यात आल्या परंतु तेथेही हॉटेल उभारण्यात आलेले नाही, आंबोलीतील मेनन कंपनीच्या जागेतही प्रश्न आहे या जमिनीवर एक तर उद्योग उभारण्यात यावे अन्यथा ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना परत देण्यात याव्या अशी मागणी भोसले यांनी नार्वेकर यांच्याकडे केली. या संदर्भात बैठक घेऊन काय परिस्थिती आहे या संदर्भात माहिती घेण्यात येईल अशी माहिती नार्वेकर यांनी दिली
सावंतवाडी/प्रतिनिधी-