Tarun Bharat

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळे यांची खाजगी दौऱ्या दरम्यान सावंतवाडीला भेट

सावंतवाडी/प्रतिनिधी-

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळे यांनी आपल्या खाजगी दौऱ्यादरम्यान सावंतवाडीला भेट दिली. आपल्या खाजगी दौऱ्यावर असलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळे यांचे सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सावंतवाडी तालुका  मधील विविध आरोग्य व पर्यटनदृष्ट्या असलेल्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली व शासनामार्फत या अडचणींवर मात करण्यासाठी लवकरात लवकर त्यांच्या स्तरावरून उपाययोजना करून मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. त्या अनुषंगाने झिरवाळेनी आपण लवकरात लवकर उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री व ग्रामविकास मंत्री यांची एकत्रित बैठक लावून  यावर लवकरात लवकर मार्ग काढू असा शब्द दिला. याप्रसंगी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, डि. के. टुरिझमचे मालक डी. के.  सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान उपस्थित होते.

Related Stories

भाजपचे उपनगराध्यक्षपद ही येणार अडचणीत

Archana Banage

‘लॉकडाऊन’मध्येही लांजातून 10 ट्रक खनिज रायगडात

Patil_p

कारागृहातून मुदतपूर्व सुटकेसाठी शशिकला नटराजन यांचे प्रयत्न

Omkar B

दाभोळमध्ये निसर्ग चक्रीवादळात लाखोंची हानी

Patil_p

अपुऱया डोसमुळे आज लसीकरण बंद

Patil_p

अंजनवेल समुद्रात मच्छीमार बोटीला जलसमाधी!

Patil_p