वार्ताहर /बाळेकुंद्री
समर्थ अमोल किल्लेकर (वय 6) या बालकाला बेळगाव येथील अरिहंत इस्पितळात हृदय शस्त्रक्रियेसाठी आई-वडिलांची दाखल केले आहे. शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपयांचा खर्च येणार असून आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने किल्लेकर कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून बाळेपुंद्री खुर्द ग्रा. पं. माजी अध्यक्ष प्रशांत अनंतराव जाधव यांनी 25 हजार रूपये कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. यावेळी शशीकला अनंतराव जाधव उपस्थित होत्या.