मागील 24 तासांमध्ये युक्रेनच्या मदतीसाठी मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs आणि उपकरणे पूर्व युरोपमध्ये पोहोच्ली आहेत. 7 देशांच्या 20 विमानांमधून ही सामग्री पाठविण्यात आली आहे. अमेरिकन शस्त्रास्त्रs, रॉकेट, दारूगोळा तसेच सुरक्षा विषयक हेल्मेटही पाठविण्यात आल्यगाची माहिती अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱयाने दिली आहे. 12 हून अधिक अतिरिक्त विमानांद्वारे अमेरिकेकडून निर्मित तोफा, रडार सिस्टीम आणि फीनिक्स घोस्ट ड्रोन युक्रेनच्या मदतीसाठी पोहोचणार आहेत.
पूर्व युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याचा वेग मंदावलेला आहे. तेथे युक्रेनचे सैन्य रशियाला आव्हान देत असल्याचा दावा पेंटागॉनने केला आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे सर्वात भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे. फिनलंड आणि स्वीडनच्या नाटोमधील समावेशाला अमेरिकेचे समर्थन असल्याचे उद्गार विदेशमंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी खासदारांना संबोधित करताना काढले आहेत. ब्रिटन आता पूर्ण युरोपमध्ये नाटो दलांमध्ये सामील होण्यासाठी 8 हजार सैनिक पाठविणार आहे. शीतयुद्धानंतर ही आतापर्यंतची सर्वात मोठी तैनाती ठरणार आहे. तर दोन ब्रिटिश स्वयंसेवकांना रशियाच्या सैन्याने पकडले आहे. 3 जणांना युक्रेनमधून बाहेर पडण्यास हे ब्रिटिश स्वयंसेवक मदत करत होते.
युरोपीय महासंघाचे अधिकारी रशियाच्या कच्च्या तेलावरील संभाव्य बंदीसंबंधी चर्चेचे नेतृत्व करत आहेत. जर्मनीने नरमाईची भूमिका घेतल्यावर कटऑफचा वेग वाढत आहे. रशियाच्या कच्च्या तेलावरील बंदीच्या चर्चेपासून आता एक महत्त्वपूर्ण बदल घडून आला आहे.