Tarun Bharat

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे विद्यार्थ्यांना मदत

प्रतिनिधी /बेळगाव

अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक मदत वितरण कार्यक्रम नुकताच मारुती गल्ली येथील समर्थ सोसायटीच्या हॉलमध्ये पार पडला. आजवर विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयेपर्यंतची शैक्षणिक मदत देण्यात आली असल्याची माहिती विनायक जोशी यांनी दिली.

याप्रसंगी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ बेळगावचे उपाध्यक्ष सुधीर जोशी, कार्याध्यक्ष सुहास कुलकर्णी, कार्यवाह विनायक जोशी, खजिनदार अभय जोशी व समर्थचे व्यवस्थापक अरविंद कुलकर्णी उपस्थित होते. सुहास कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून संघाच्या कार्याची माहिती दिली. सुधीर जोशी यांनी आभार मानले. यावेळी राघवेंद्र केसनूर यांच्यासह बेळगाव, उगार खुर्द, निपाणी या भागातील पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

प्रा. जी. के. खडबडी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

Amit Kulkarni

मनपा आयुक्तांकडून विविध विकासकामांची पाहणी

Patil_p

‘हॅप्पी न्यू इयर’ आणि नंबर 1 वर बियर!

Patil_p

कंजूमर फोरम न्यायालयासाठी खानापूर बार असोसिएशनचा रास्तारोको

Tousif Mujawar

रेणुकादेवी भक्तांसाठी कपिलेश्वर मंदिरात सोय

Amit Kulkarni

सीमावासियांच्या मदतीला सदैव तत्पर

Amit Kulkarni