Tarun Bharat

चिंचोळे येथे सांडपाणी प्रवाहित वाहिनी फूटून सर्वत्र दुर्गंधी

प्रतिनिधी /पणजी

चिंचोळे पणजी दत्त मंदीर परिसरात सांडपाणी प्रवाहित करणारी एक वाहिनी फूटून ती सर्वत्र पायवाटेवर व रस्त्यावरुन गेले. 8 दिवस गटाराचे दुर्गंधीग्रस्त पाणी वहात असून कोणीही त्याची दुरुस्ती करण्यास येत नाही याबाबत त्या परिसरातील मंडळीनी तिव्र नापसंती व्यक्त केली आहे.

Advertisements

दत्त मंदिरात प्रवेश करणारी अनेक मंडळी या रस्त्यावरुन चालत पुढे मंदिरात जातात. जात असताना गटाराच्या पाण्याच्या वाढत्या प्रवाहातूनच त्यांना पुढे जावे लागते. या गटाराच्या पाण्याने दुर्गंधीमय असे वातावरण झालेले असून जनतेच्या भावनांचा तरी पणजी महापालिकेने व या प्रभागातील नगरसेवकाने विचार करावा व त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी त्या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Related Stories

कोरोना बळींचा आकडा 350 पार

Patil_p

आमदार झांटय़े यांनी मये मतदारसंघातील कामांची श्वेतपत्रिका जाहीर करावी

Amit Kulkarni

कोविड इस्पितळात 40 नवे रुग्ण दाखल

Omkar B

गोवा हे कल्याणकारी राज्य बनविण्यास वचनबद्ध- राज्यपाल

Amit Kulkarni

हस्तांदोलनावेळी लस घेतल्याची विचारपूस करा

Amit Kulkarni

कोवळ्या मुलांना दुचाक्या देऊन मृत्यूच्या खाईत लोटू नका

Amit Kulkarni
error: Content is protected !!