ऑनलाईन टीम/तरुण भारत
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये भीषण गोळीबार झाला असून, त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले. बफेलो येथील जेफरसन अव्हेन्यूजवळ गोळीबार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान हल्लेखोर पकडला गेला आहे. पोलीस आणि इतर आपत्कालीन सेवांनी या घटनेवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आणि लोकांना येथे येण्याचे टाळण्यास सांगितले आहे.
बंदुकधारी हल्लेखोराने दुपारी बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये अचानक लोकांवर गोळीबार केला, ज्यात सुमारे १० लोक ठार झाले आणि ३ लोक जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, टॉप फ्रेंडली सुपरमार्केटमध्ये अनेक लोक या गोळीबारात सापडले आहेत. सध्या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे.
शनिवारी ही गोळीबाराची घटना घडली आहे. अधिकाऱ्यांना १२७५ जेफरसन अॅव्हेन्यूतील स्टोअरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समजली. जेव्हा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा अनेक जण सुपरमार्केटच्या बाहेर जमीनीवर तर काही दुकानात आतल्या बाजूला पडल्याचे दिसून आले.
पोलिस अधिकाऱ्यानी सांगितले की, हल्लेखोराने लष्करासारखे कपडे घातले होते. त्याच्या शरीरावर बुलेटप्रुफ जॅकेटही होते. जेव्हा तो गाडीतून बाहेर निघाला तेव्हा त्याच्या हातात शस्त्रे होती. त्याच्याकडे टॅक्टिकल गिअर आणि हेल्मेटसुद्दा होतं. तसंच एक कॅमेरासुद्धा होता. गोळीबाराच्या घटनेचं त्याने लाइव्ह स्ट्रिमिंग केलं.