अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल सोमवारी लग्न बंधनात अडकले आहेत. या बाबत अथियाचे वडिल आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांनी यांनी माध्यमांना माहीती दिली असून हा विवाह खाजगीरित्या शेट्टी परिवाराच्या अत्यंत जवळच्या लोकांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अभिनेता सुनील आणि त्याचा मुलगा अभिनेता अहान शेट्टी यांनी लग्नस्थळावर जमलेल्या माध्यम प्रतिनिधींना मिठाई वाटून याची माहीती दिली. हा सोहळा सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर पार पडला.


सुनील शेट्टीने यावेळी सांगितले की तो आता ‘अधिकृतपणे सासरा’ झाला आहे. “अथिया आणि राहूलचा विवाह खूप सुंदर, आणि अतिशय जवळच्या लोकांमध्ये कौटुंबिकरित्या पार पडला. लग्न खूप चांगले झाले, नवरा आणि नवरीचे पेहराव अतिशय सुंदर झाले आहेत. हा लग्नसोहळा अधिकृतपणे पार पडला आहे.”


दरम्यान, प्रमुख पाहुणे असलेल्या अभिनेत्री डायना पेंटी, कृष्णा श्रॉफ आणि अंशुला कपूर यांसारख्या सेलिब्रिटी ऑल-व्हाइट आउटफिट्समध्ये लग्नामध्ये दिसल्या. त्यांनी लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडीया साईटवर टाकल्याने ते सध्या इंटरनेटवर फिरत आहेत.
लग्नसोहळ्यातील एका व्यक्तीने सांगितले की, “हे अत्यंत जवळचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. लग्नात फक्त जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबातील सदस्य झाले आहेत. त्यामुळेच सामाजिक, राजकिय आणि उद्योग विश्वातील लोक या सोहळ्यास दिसत नाहीत.”


अथिया आणि केएल राहुल याअगोदर काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांनी एकमेकांबद्दल जाहीरपणे कधीच सांग्तले नसले तरी दोघांचे फोटो सोशल मीडियावर झळकत होते.
शेवटी त्यांनी अथियाच्या वाढदिवसादिवशी इन्स्टाग्रामवर पोस्टसह हे जाहीर केले.
त्यानंतर तिचा भाऊ अहान शेट्टीच्या तडप या डेब्यू चित्रपटच्या स्क्रीनिंगमध्येही त्यांनी याबाबत सुतोवाच केले.