Tarun Bharat

एटीएम कॅश व्हॅन घेऊन चालक फरार

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

एटीएम सेंटरमध्ये पैसे भरणारी कॅश व्हॅन (Cash Van) घेऊन चालक पसार झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत गुरुवारी रात्री घडली. चालक जेव्हा ही व्हॅन घेऊन फरार झाला, तेव्हा व्हॅनमध्ये 82 लाख रुपयांची रोकड असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीचा सुरक्षारक्षक आणि एटीएममध्ये पैसे भरणारी व्यक्ती गुरुवारी रात्री उरण परिसरातील एटीएममध्ये पैसे भरून बामनडोंगरीला निघाली होती. दरम्यान, एका एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी सुरक्षारक्षक आणि सोबतचा व्यक्ती गेला असता चालक ही कॅश व्हॅन घेऊन फरार झाला. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघताना या व्हॅनमध्ये दोन कोटी रुपयांची रोकड होती. जेव्हा गाडी घेऊन चालक पसार झाला तेव्हा गाडीत 82 लाख रुपये होते. सुरक्षारक्षकांनी नवी मुंबईतील एनआरआय पोलीस स्थानकात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या व्हॅनचा शोध घेतला तेव्हा ती व्हॅन बेलापूरमधील पारसिक येथे आढळून आली. मात्र, चालक अद्यापही पैसे घेऊन फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 3 हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

सातारा तालुक्यात पाठ्यपुस्तकांचे वितरण

Archana Banage

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

Tousif Mujawar

आरटीओ कार्यालयाचे काम सोमवारपासून सुरु होणार

Patil_p

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सुरुच; 14,718 नवे रुग्ण; 355 मृत्यू

Tousif Mujawar

शिवसेना आमदाराला अंडरवर्ल्डमधून धमकीचा फोन

datta jadhav
error: Content is protected !!