Tarun Bharat

बांगलादेशात हिंदूंवर हल्ले पूर्वनियोजित कटातूनच

ढाका  / वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेशात हिंदू समाजावर झालेले हिंसक हल्ले हे पूर्वनियोजित कटकारस्थानातूनच झाले होते, असे एका व्हिडीओ चित्रणातून स्पष्ट झाले आहे. हे हल्ले कथित ईश्वरनिंदेचे निमित्त पुढे करुन करण्यात आले होते, असाही पर्दाफाश झाला आहे. बांगलादेश सरकार हल्ल्यांची चौकशी करीत आहे.

या देशातील एक लोकप्रिय टीव्ही वाहिनी ‘एकातूर टीव्ही’ने हे कटकारस्थान उघड केले आहे. बांगलादेशातील इस्लामी दशहतवादी संघटनांच्या हस्तकांनी हा हिंसाचार घडविला होता. या हिंसाचाराचा जोर नरैल जिल्हय़ात सर्वाधिक होता. स्थानिक धार्मिक आणि राजकीय नेत्यांनी दंगलखोर जमावाचे नेतृत्व केले. या नेत्यांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरुन पटलेली आहे. आपले चेहरे सीसीटीव्हीत दिसत असतानाही या नेत्यांनी त्यांच्या कृत्याचे निर्लज्ज समर्थन केलेलेही दिसून येते. त्यांच्या मनात पश्चात्तापाची कोणतीही भावना नसल्याचे स्पष्ट होत आहे.

हल्ले करण्यापूर्वी अर्धा तास हे दंगलखोर एका मशिदीतून बाहेर येत असलेले व्हिडीओ चित्रणात दिसून येतात. त्यांची संख्या चारशे ते पाचशे इतकी होती. हल्लेखोर मोबाईलवरुन त्यांच्या म्होरक्यांना दंगलींची माहिती देत होते. तसेच आपण हिंदूंविरोधात कसा ‘पराक्रम’ गाजवला, याचीही माहिती ते त्यांच्या नेत्यांना देत होते, असे या एकातूर टीव्ही वाहिनीचे म्हणणे आहे.

हिंदू शिक्षकांवर हल्ले

बांगलादेशमध्ये हिंदूविरोधी वैमनस्याची भावना वेगाने पसरत आहे. ज्या भागांमध्ये पूर्वी कधीही दंगल किंवा तणाव निर्माण झाला नव्हता, तेथेही गेल्या काही दिवसांमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत. आता या देशाच्या ग्रामीण भागातील हिंदू शिक्षकांना लक्ष्य करण्यात येत आहे. स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये हे शिक्षक आदरणीय असल्याने त्यांना लक्ष्य केले जात आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

किम जोंग उन यांचा पुतण्या बेपत्ता

datta jadhav

स्वतःच्या हातांकडे पाहण्याचीच भीती

Patil_p

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सल्लागार मंडळात भारतीय

Patil_p

ब्राझीलमध्ये 68.75 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

…प्रसंगी सीपॅक रद्द करू

Patil_p

मालदीव 15 जुलैपासून पर्यटकांसाठी खुले

datta jadhav