Tarun Bharat

भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या निवासावर हल्ल्याचा प्रयत्न

काँग्रेस युवा विंगच्या चार कार्यकर्त्यांना अटक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर आग लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या युवा शाखा – ‘नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयुआय) चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. ही घटना 21 जून रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रसंगी 8-10 कार्यकर्ते नड्डा यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. त्यांनी घोषणाबाजी करत जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी घराच्या गेटवर असलेल्या सुरक्षा कक्षात पेटते लाकूड फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा कर्मचाऱयांनी हा प्रकार रोखला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 10-12 जण दोन वाहनांतून आल्याचे समोर आले आहे. या वाहनांची नोंदणी हरियाणातील रोहतक आणि उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आहे. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळय़ा ठिकाणी छापे टाकून चार जणांना अटक केली. जगदीप सिंग, समस्थ राणा, प्रणव पांडे आणि विशाल अशी अटक केलेल्यांची नावे असून ते चौघेही ‘एनएसयुआय’चे कार्यकर्ते असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. सध्या राहुल आणि सोनिया गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीच्या फेऱयात अडकल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चौकशीला वेगवेगळय़ा आंदोलनांच्या माध्यमातून विरोध केला जात आहे.

Related Stories

भवानीपूरसह तीन ठिकाणी ३० सप्टेंबरला मतदान; ममता बॅनर्जीही लढणार पोटनिवडणूक

Abhijeet Shinde

लखनऊमध्ये एटीएसने दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

Abhijeet Shinde

कोरोना उपचारांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

datta jadhav

उत्तर प्रदेश : तब्बल एक वर्षानंतर शाळा सुरू; केक भरवून विद्यार्थ्यांचे केले स्वागत

Rohan_P

बिहारच्या प्रीति प्रियदर्शिनीला प्रतिष्ठेचा जागतिक पुरस्कार

Patil_p

एसबीआयच्या गृहकर्ज व्याजदरात कपात

Patil_p
error: Content is protected !!