Advertisements
वसगडे/वार्ताहर
पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथील डॉ. रफिक तांबाेळी यांची स्विफ्ट डिजायर चारचाकी कार पेटविण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला असून यामुळे गावात खळबळ माजली आहे.
डॉ. तांबाेळी यांनी काही दिवसापूर्वी चारचाकी गाडी घेतली असून नेहमी प्रमाणे त्यांनी गाडी प्राथमिक आराेग्य उपकेंद्र परिसरात पार्किंग केली हाेती. शनिवारी रात्री अज्ञाताने जवलनशील पदार्थ टाकून गाडी पेटविण्याचा प्रयत्न केला आहे.
रात्री पावसामुळे आग विझली असावी त्यामुळे गाडीचे फार नुकसान झाले नाही. परंतु प्रत्यक्षदर्शींनी पाहिले असता संपर्ण गाडी पेटविण्याचा प्रयत्न हाेता असं दिसत आहे. याप्रकरणी भिलवडी पाेलीस स्टेशनला गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.