Tarun Bharat

एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न

प्रतापगंज पेठेतील घटना ः अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल, पोलिसांनी केला पंचनामा

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील प्रतापगंज पेठेतील एचडीएफसी बॅँकेत सोमवारी चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली. शनिवार, रविवार बंद असल्याने अज्ञाताने यांचा फायदा घेतला. बॅँकेच्या किचनमधील खिडकीचे गज तोडण्यात आले आहेत. याची माहिती बॅँकेतील अधिकाऱयांना कळताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक संजय पंतगे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यामध्ये चोरटय़ांनी कशावर डल्ला मारला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू केला आहे.

    जिह्यात घरफोडय़ाचे सत्र सुरू असताना अद्याप गुन्हेगार जेरबंद झालेले नाहीत. तोच शहरातील प्रतापगंज पेठेतील एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली. शनिवार, रविवार असे दोन दिवस सुट्टी असल्याने अज्ञाताने यांचा फायदा घेतला. या बिल्डिंगमध्ये बॅँकेच्या पाठीमागील बाजुला किचन आहे. या किचनच्या खिडकीचे लोखंडी गज कापून अज्ञाताने आत प्रवेश केला. ही बाब बॅँकेतील कर्मचाऱयांच्या लक्षात आले. त्यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱयांना यांची कल्पना दिली. त्यांनी थेट शाहूपुरी पोलिसांना यांची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. श्वान पथकाने मागच्या बोळापर्यंत माग काढला. या अज्ञाताविरूद्ध गुन्हा ही दाखल झाला आहे.

दिवसभर बॅँक बंद

आठवडय़ाचा पहिला वार म्हणजे सोमवार या दिवशी बँकेत गर्दी असते. परंतु दिवसभर एचडीएफसी बँकेत लोक येत होते. आणि बँक बंद असल्याने परत जात होते. अनेकांना नक्की बँक का बंद आहे. याचे कारण कळु शकले नाही. बँकेतील सर्व्हर डाऊन असल्याचे सांगण्यात येत होते.

Related Stories

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस

Tousif Mujawar

सातारा : पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक शांततेत पार पाडा : निवडणूक निरीक्षक

Archana Banage

सातारा : परळी खोऱ्यात पुन्हा कोरोना फोफावतोय

Archana Banage

राऊत चवन्नी छाप, तर ठाकरे महिलेला घाबरले: रवी राणा

Rahul Gadkar

ज्यांना सर्व काही दिले, तेच पक्षावर उलटले

Patil_p

शिवशंभोचे दर्शन मंदिराबाहेरुनच…

Patil_p