सांगली/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरातील चिंचणी नाक्यात एका युवकांने विजेच्या खांबावर चढून तारांशी छेडछाड करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रशांत केशव माळी राहणार गोटेवाडी रोड तासगाव असे या युवकाचे नाव असून, बायको नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे प्राणघातक कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. तो खांबावर चढत असतानाच अनेक लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने न ऐकल्याने नागरिकांनी महावितरण सांगून वीज प्रवाह खनदीत केला. दरम्यान, तो युवक खांबाच्या एकदम टोकावर जाऊन तारांशी छेडछाड करू लागल्याने लोकांनी त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो किमान अर्धा तास तरी या तारांशी खेळत होता. तर उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राहून वीज प्रवाह बंद केल्याने त्याचे प्राण वाचलेत. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.