Tarun Bharat

दुध उत्पादकानो सावधान!!! फोंडय़ात फोफावतोय लम्पी वायरस!!

Advertisements

 पशुसंवर्धन खाते, डेअरीचे वेटरनरी धावले शेतकऱयाच्या मदती : सन 2019 पशुगणनेनुसार राज्यात 87454 गायी-म्हशी

प्रतिनिधी /फोंडा

गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या संलग्न दुध उत्पादकांना लम्पी वायरसची लागण होऊ नये यासाठी सर्व शेतकऱयांनी दक्षता बाळगावी. गायी म्हशींला वॅक्सिन देऊन सुरक्षा द्या. दुध उत्पादकांच्या सेवेसाठी डेअरीतर्फे सर्वतोपरी मदत पुरविणार असून शेतकऱयाच्या माहितीसाठी गोवा डेअरीतर्फे खास लम्पी वायरसपासून बचाव व सुरक्षेच्या उपायासंबंधी मार्गदर्शक पुस्तिकेचे वितरण् करण्यात आल्याची माहिती गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी दिली. 

  राज्यात सुमारे 8 गायीना लम्पी वायरसची लागण झाल्याची माहिती पशुसंवर्धन खात्याचे संचालक आगुस्तिनो मिष्कीता यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केलेली आहे. वायरसची सर्वाधिक लागण फोंडा तालूक्यातील प्रियोळ मतदारसंघातील गायींना झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. त्याची धास्ती घेत गोवा डेअरीने आपल्या चारही पशुवैद्यकीय वेटरनरी डॉक्टरांना कायम शेतकऱयांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचे आदेश दिलेले आहे. लम्पी वायरसची जागृतीसंबंधी शेतकऱयांनी आपल्या गोठय़ाची स्वच्छता कशी राखावी, जनावरांना डांसापासून संसर्ग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शक पुस्तिकेचे वितरण केलेले आहे. वायरससंबंधी शेतकऱयांनी आवश्यक काळजी घेतल्यास दुधविक्रीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लम्पी स्किन आजारासंबंधी जागृती महत्चाची-राजेश फळदेसाई

   महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि काही शेजारील राज्यातील दुधाळ जनावरांत लम्पी आजाराचा उद्रेक झालेला आहे. आजार संसर्गजन्य असून डांस, घरगुती माश्या, गोचिड यांनी चावा घेतल्यानंतर तसेच प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या लाळेतून व चाऱयामधून लवकर पसरत असल्याचे दिसून येते. यासंबंधी जनजागृतीसाठी माहिती पुस्तिका उपलब्ध असून त्यासाठी डेअरीच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन राजेश फळदेसाई यांनी केले आहे. 

   गोठयाची स्वच्छता, कडूनिंबाच्या पाण्याची आंघोळ घाला-दुर्गेश शिरोडकर

    फोंडा तालूक्यात लम्पी वायरसच्या वाढता धोक्यापासून शेतकऱयानी गोटय़ाची  गायींची स्वच्छता राखत सुरक्षितता बाळगावी. सांतेमळ राय येथील दुध उत्पादक तथा गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर आपल्या गोठय़ात स्वतः गुरांची काळजी घेत आहेत. लम्पी वायरसची लागणपासून गायींना सुरक्षा देताना रात्रीच्या वेळी कापूरजन्य शेणींचा धुर, तसेच कडूनिंबूच्या पाने गरम पाण्यात मिसळून त्यानंतर त्या पाण्याने गायींचे शरीर स्वच्छ पुसून काढण्याचे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

    राज्यात 60247 गायी तर 27207 म्हशींची संख्या  

  सन 2019 च्या  पशुगणनेनुसार दक्षिण गोव्यात 33291 गायी तर 14618 म्हशी आहेत. उत्तर गोव्यात 26956 गायी तर 12589 म्हशी आहेत. राज्यात सुमारे  87454 गुरे असल्याचा आकडा पशुगणनेनुसार जाहीर करण्यात आलेला आहे. राज्यातील बहुतेक गुरांना लम्पी वायरससंबंधी वॅक्सीन पुरविल्याचा दावा पशुसंवर्धन खात्याने केलेला आहे. मात्र ऑनग्राऊंड परिस्थिती नेमकी काय आहे याची माहिती वायरसच्या प्रादुर्भाव कसा नियंत्रणात येईल यावरून दिसून येईल. दरम्यान फोंडा पशुसंवर्धन खात्यातील कर्मचाऱयांनी वायरसची जागृतीसाठी कचेरीत अडकून न बसता केवळ फिल्डवर शेतकऱयाच्या तक्रारी निवारणासाठी आपला मोर्चा वळविल्याचे येथे भेट दिल्यानंतर दिसून येते. वायरससंबंधी प्राथमिक माहिती देण्यातही येथील कर्मचारी  कचरतात असे दिसून येते.  

Related Stories

पेडणे मतदारसंघातुन स्थानीक उमेदवार राजन कोरगावकर यांनाच उमेदवारी द्या ,धारगळमधील जेष्ठ भाजप कार्यकर्त्यांची पत्रकार परिषदेतून मागणी

Omkar B

उसगांवात भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढत

Patil_p

वीज ‘ओटीएस’ योजनेस 31 जानेवारीपर्यंत वाढ

Patil_p

शाळांच्या विलिनीकरणाचा निर्णय तत्काळ मागे घ्या

Amit Kulkarni

जलशुद्धीकरण लघु प्रकल्प साळमध्येच झाला पाहिजे

Amit Kulkarni

पश्चिमी बगलरस्त्याच्या सल्लागारावर कारवाई करावी

Patil_p
error: Content is protected !!