मखरींच्या किमतीं तब्बल 20 टक्यांनी वाढल्या
प्रतिनिधी/ सातारा
गणेशोत्सव जवळ येवू लागलेला आहे. गणेशोत्सव यावर्षी मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी सातारकरांची जय्यत तयारी सुरु आहे. सलग चार वर्षे आलेल्या संकटामुळे गणेशोत्सव उत्साही वातावरणात साजरा करता आलेला नव्हता. यंदा मात्र गणेशोत्सवाच्या तयारीकरता शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे आणि मखर विक्रीचे स्टॉल लागलेले आहेत. यामध्ये तब्बल 20 ते 25 टक्के किमतीमध्ये वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सातारकर आर्वजून स्टॉलला भेट देत आहेत.
गेल्या पाच वर्षापासून सलग संकटे आलेली आहेत. महापुराचे, भूसख्खलनाचे, कोरोना महामारीची अशी संकटे आल्याने सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांनी आणि शहरातील गणेश भक्तांनी साजरा केला नव्हता. यंदा सण उत्सवावरील विघ्ने आता टळली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरात जोरदारपणे तयारी सुरु झाली आहे. शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लागलेले आहेत. तसेच मखर विक्रीची प्रदर्शनेही लागलेली आहेत. त्यामध्ये मखरच्या किमती 900 रुपयांपासून 30 हजार रुपयांपर्यंतच्या मखर उपलब्ध आहेत. सर्व मखर या पर्यावरण पुरक पुन्हा वापरता येणाऱया अशा आहेत. वॉटर फॉल, आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या, कागदी पुठय़ापासून तयार केलेल्या या मखर आहेत.
प्रतिसाद चांगला आहे
सातारकरांचा चांगला प्रतिसाद मखर प्रदर्शनास मिळत आहे. समर्थ एन्टरप्राझेसचे हे प्रदर्शन विसावा नाका परिसरात आहे. तीन वर्षानतर हे प्रदर्शन भरवले आहे. कच्या मालाच्या किमती 20 टक्के वाढल्या आहेत. त्यामुळे मखरीच्या किमतीत वाढ झालेली आहे.