Tarun Bharat

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा – अतुल भातखळकर

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

Patra Chawl Scam : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. अतुल भातखळकर यांनी ही मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते, असेही भातखळकरांनी म्हटलं आहे. दरम्यान, भतकळकरांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे.

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळं मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळं या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

Related Stories

शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही; आदेश बांदेकरांच्या पोस्टवर सडेतोड उत्तर

Abhijeet Khandekar

पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला

datta jadhav

कुणी सर्टिफिकेट देता का सर्टिफिकेट..?

Patil_p

पुण्यात लॉक डाऊनच्या काळात सर्वाधिक 11,577 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

दिल्ली : दिवसभरात 384 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

विधानपरिषद निवडणुकीत मतदान न करणाऱ्या ‘त्या’ आमदारांवर कारवाई करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Kalyani Amanagi