क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
ठळकवाडी येथे कृसेबल स्नूकर अकादमी आयोजित आंतरराज्य स्नूकर स्पर्धेत बेळगावच्या अतुल कदमने कोल्हापूरच्या अमेयचा 3-0 असा पराभव करून कृसेबल चषक पटकाविला.
टिळकवाडी येथील कृसेबल स्नूकर अकादमीच्या सभागृहात अभिजित मोरे आयोजित आंतरराज विभागीय स्नूकर स्पर्धेत 40 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर व बेळगावच्या स्नूकरपटूंचा समावेश होता. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बद्रू, स्वयं, अबूबी व राजीव यांना पराभव पत्करावा लागला. पहिल्या उपांत्य सामन्यात अतुल कदमने प्रथमेश आपटेचा 2-1 असा तर दुसऱया उपांत्य सामन्यात अमेयने नितीन बी.चा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात अतुल कदमने अमेयचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
बक्षीस वितरण प्रसंगी अस्मिता एंटरप्रायझेसचे राजेश लोहार, अतित बेलेकर, आसीफ मुल्ला, अभिजित मोरे यांच्या हस्ते विजेत्या अतुल कदमला आकर्षक चषक, 10 हजार रूपये रोख तर उपविजेत्या अमेयला चषक व 5 हजार रूपये देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृसेबल स्नूकर अकादमीच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.