करार मुदत संपल्याने169 गाळे भाडय़ाने देणार : दोन दिवसात होणार अधिसूचना जारी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी विविध ठिकाणी व्यापारी संकुलांची उभारणी केली आहे. काही ठिकाणी गाळे उभारले आहेत. यापैकी असंख्य गाळय़ांच्या भाडे कराराची मुदत संपल्याने नव्याने भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. शहर व उपनगरातील 169 गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी दि. 6 ते 16 मे पर्यंत लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मनपाच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्वावर दिले होते. 181 गाळय़ांची करार मुदत मार्चमध्ये संपली असून मुदतवाढीसाठी अर्जाची सूचना महापालिकेने केली होती. त्यानुसार काही गाळेधारकांनी लीज वाढीसाठी मनपाकडे अर्ज केले आहेत. महात्मा फुले भाजीमार्केट, फिशमार्केट, कसाई गल्लीतील मटन मार्केट, कोनवाळ गल्लीतील गाळे, महांतेशनगर, शिवबसवनगर अशा विविध ठिकाणी असलेले 169 गाळे भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता येत्या दोन दिवसात अधिसूचना जारी करणार आहेत.
31 मार्च रोजी मुदत संपलेले 181 गाळे व अन्य ठिकाणी असलेल्या गाळय़ांसह 330 गाळे भाडेतत्वावर देणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र यापैकी केवळ 169 गाळय़ांच्या लिलावाची तयारी महसूल विभागाने केली असल्याची माहिती मिळाली आहे. पण उर्वरित गाळे भाडेतत्वावर देण्यात येणार नाहीत का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. 330 पैकी केवळ 169 गाळय़ांच्या लिलावाचा प्रस्ताव आहे. यामध्ये फुले भाजी मार्केट, कसाईगल्ली व कोनवाळ गल्ली अशा विविध गाळय़ांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट बसथांब्यांवर उभारलेले कीऑस्कचे गाळे भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत.
गाळय़ांचा तिसऱयांदा लिलाव करणार
यापूर्वी दोनवेळा लिलाव प्रक्रिया राबविली होती. लिलाव प्रक्रियेत नागरिकांनी सहभाग घेतला होता. काही गाळय़ांना बोलीही लावली होती. मात्र अनामत रक्कम भरली नसल्याने लिलाव प्रक्रिया रद्द झाली आहे. याच गाळय़ांचा आता तिसऱयांदा लिलाव करण्यात येणार आहे. दि. 6 ते 16 मे दरम्यान लिलाव प्रक्रिया चालणार आहे. पण मोक्मयाच्या आणि व्यावसायिकांची मागणी असलेल्या गाळय़ांचा समावेश यामध्ये आहे का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.