Tarun Bharat

एजाझ पटेलच्या ‘त्या’ शर्टचा लिलाव

Advertisements

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

 ऑकलंड येथे एका प्रचंड मोठय़ा हॉस्पिटलच्या मदतीसाठी न्यूझीलंडचा 33 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज एजाझ पटेलने आपल्या शर्टचा लिलाव केला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये मुंबईत झालेल्या भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 बळी घेण्याचा विक्रम केला होता. या सामन्यात परिधान केलेल्या शर्टचा पटेलने लिलाव केला.

 कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 10 बळी घेण्याचा विश्वविक्रम आतापर्यंत जगातील तीन गोलंदाजांनी केला आहे. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जिम लेकर, भारताचा अनिल कुंबळे आणि न्यूझीलंडचा एजाझ पटेल या तीन गोलंदाजांनी आतापर्यंत हा विक्रम नोंदविला आहे. न्यूझीलंडच्या राष्ट्रीय चिल्ड्रन हॉस्पिटलमधील स्टारशीप रेडिओलॉजी विभागातील थेरपिस्टसाठी या निधीचा वापर केला जाणार असल्याची माहिती पटेलने दिली. मुंबईच्या कसोटीत विक्रम करणाऱया एजाझ पटेलच्या या शर्टवर भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱया करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या या कसोटीनंतर पटेलने आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नसून आता त्याची पुढील महिन्यात इंग्लंडविरूद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात निवड करण्यात आली आहे.

Related Stories

अमेरिकेची केनिन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

ब्रिटनच्या मरेची विजयी सलामी

Amit Kulkarni

धोनीचा झारखंड संघासमवेत सराव

Patil_p

हॅलेप- मर्टन्स यांच्यात अंतिम लढत

Patil_p

लिजेंड्स लीग स्पर्धेत गौतम गंभीर खेळणार

Patil_p

निपाणी भागातील खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य

Patil_p
error: Content is protected !!