वृत्तसंस्था/मुंबई
2024 च्या 11 व्या प्रो-कबड्डी लीग हंगामासाठी येथे 15 आणि 16 ऑगस्ट रोजी कब•ाrपटूंचा लिलाव कार्यक्रम आयोजित केला आहे. आगामी हंगामासाठी विविध संघांच्या फ्रांचायजीनी 88 कबड्डीपटू कायम ठेवल्याने या लिलाव कार्यक्रमात पवन शेरावत आणि प्रदीप नरवाल या कबड्डीपटूंना चांगलाच दणका बसला आहे.
दबंग दिल्ली संघाने आशु मलिक व नवीनकुमार या दोन कबड्डी पटूंना कायम ठेवले आहे. पुणेरी पल्टनने अस्लम इनामदार, जयपूर पिंक पॅन्थर्सने हुकमी रायडर अर्जुन देस्वाल यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेलता आहे. त्यामुळे पवन शेरावत व प्रदीप नरवाल या अव्वल कबड्डीपटूंना आगामी लिलावावेळी चांगलाच फटका बसणार आहे. या लिलावावेळी अ गटासाठी 30 लाख, ब गटासाठी 20 लाख तर क गटासाठी 13 लाख आणि ड गटासाठी 9 लाख रुपयांची मुळ किंमत कायम ठेवण्यात आली आहे.