Tarun Bharat

5-जी स्पेक्ट्रमसाठी 26 जुलैला लिलाव

Advertisements

नवी दिल्ली

 5-जी स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलै रोजी होणार आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी 8 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. अर्जदारांच्या मालकीचे तपशील 12 जुलै रोजी प्रकाशित केले जाणार आहेत. त्यानंतर सरकार 20 जुलै रोजी लिलावात सहभागी होणाऱयांची यादी जाहीर करणार आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी समूहाने उत्सुकता दर्शवली आहे. साहजिकच मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील ‘रिलायन्स जिओ’ आणि सुनील भारती यांच्या ‘एअरटेल’ यांची लिलावात भाग घेणाऱया अदानी समूहासोबत कडवी स्पर्धा होण्याची शक्मयता आहे.

मार्च 2023 पर्यंत देशात 5-जी सेवा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने सरकारने तयारी चालवली आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंबंधी स्पष्ट संकेत देतानाच ही सेवा 4-जी पेक्षा 10 पट वेगवान असेल असे सांगितले होते. 20 वर्षांच्या कालावधीसाठी एकूण 72,097 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाईल, असेही ते म्हणाले होते.

Related Stories

देशातील पहिल्या सी-प्लेन सेवेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

datta jadhav

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होणार ‘हायटेक’

Patil_p

स्वदेशी समाजमाध्यम ऍपचे आज सादरीकरण

Patil_p

ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टरमध्ये दाखल

Patil_p

भारतीय महिला अंतराळात झेपावणार

datta jadhav

उत्तराखंडात कोरोना बाधितांची एकूण संख्या  3686 वर 

Rohan_P
error: Content is protected !!