एसयूव्हीची किमत 88.08 लाख रुपये, सुविधांनी युक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनी कंपनी ऑडीने भारतीय बाजारात सणासुदीच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर ऑडी आवृत्ती क्यू 7 एसयूव्ही हे मॉडेल सादर केले आहे. सदरच्या मॉडेलची भारतीय बाजारातील किमत ही 88.08 लाख रुपये (एक्स शोरुम किमत) राहणार असल्याची माहिती आहे. लिमिटेड आवृत्ती क्यू 7 कार आता सर्वात वेगळी बनविण्यासह ऑडीने या एक्सटीरियरला एक्सक्लूसिव्ह बॅरिक ब्राउन आदी कलरमध्ये हे उपलब्ध होणार आहे.
यामध्ये रनिंग बोर्ड्स आणि क्वाट्रो एन्ट्री लाइdस यासह अन्य फिचर्स मिळणार आहेत. भारतातील या आवृत्तीमध्ये क्यू 7 एसयूव्ही रेग्युलर
ऑडीसह टॉप स्पेक टेक्नालॉजीवर आधारीत राहणार आहे. हे मॉडेल भारतात उच्च उत्पन्न स्तरात लोकप्रिय होईल, असे मानले जात आहे.
मुख्य फिचर्स व सुविधा
w एसयूव्ही क्यू7 ला 3.0 लिटर, व्ही 6, टीएफएसआय इंजिन पॉवर
w यामध्ये 48 वोल्टचा माइल्ड हायब्रिड सिस्टम
w इंजिन 336.6बीएचपी पीक पॉवर व 500 एनएम पीक टॉर्क जनरेट
w स्पेशल 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन
w टॉपचे स्पीड 250 केएमपीएच व केवळ 5 ते 9 सेंकदात 0 ते 100 केएमपीएच तेजी पकडणार