अभिनेत्री यामी गौतमने स्क्रीन टेस्टच्या प्रक्रियेवरून स्वतःचे मत व्यक्त केले आहे. माझ्या बरोबरचे म्हणजेच समकालीन कलाकार जोपर्यंत ऑडिशन देत आहेत, तोपर्यंत मी देखील ऑडिशन देत राहणार आहे आणि यात मला आनंदच वाटणार आहे. जर कुणी मला स्क्रीन टेस्टसाठी बोलाविले तर खरोखरच मला आनंद होतो. परंतु केवळ मला स्क्रीन टेस्टसाठी बोलाविले आणि माझ्या समकालीन कलाकारांना त्यांच्या कनेक्शनमुळे सूट दिली तर वाईट वाटेल असे यामीने म्हटले आहे.
यामी गौतम सध्या झी5 च्या लॉस्ट या चित्रपटात दिसून येत आहे. यात तिने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. काही एंटरटेन्मेंट आउटलेट्स व्यक्तिरेखेच्या लांबीवरून माझी योग्यता ठरवतात आणि हा प्रकार चुकीचा आहे. कुठल्याही भूमिकेची खोली त्याची लांबी पाहुन ठरविणे योग्य नसते. अशा प्रकारच्या लोकांना हाताळण्याची एकच पद्धत आहे, आपण आपले काम करत रहावे आणि याचमुळे भविष्यात तुम्ही कौतुकास पात्र ठराल असे यामीने म्हटले आहे.
यामी आता लवकरच ओह माय गॉड 2 आणि चोर निकल के भागा या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. माझे सर्व चित्रपट प्रदर्शित झाले आहेत हे पाहून मला आनंद होतो असे यामीचे म्हणणे आहे. यामीच्या लॉस्ट या चित्रपटाची सध्या प्रशंसा होत असून यातील तिचा अभिनय समीक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.