Tarun Bharat

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया महिला संघ जाहीर

वृत्तसंस्था/ मुंबई

बर्मिंगहॅम येथे सुरू होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या क्रिकेट या क्रीडाप्रकारासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलियन संघ  कायम ठेवण्यात आला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलिया महिला संघाचा सलामीचा सामना भारताबरोबर 29 जुलैला होणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयर्लंड आणि पाकविरूद्ध होणाऱया टी-20 च्या तिरंगी मालिकेसाठी महिला संघाची घोषणा केली. राष्ट्रकुल आणि तिरंगी टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन महिला संघ कायम ठेवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाचे नेतृत्व मेग लॅनिंगकडे सोपविण्यात आले आहे. रॅचेल हेन्स या संघाची उपकर्णधार आहे.

ऑस्ट्रेलियन महिला संघ-मेग लॅनिंग (कर्णधार), हेन्स (उपकर्णधार), ब्राऊन, कॅरे, गार्डनर, हॅरीस, ऍलिसा हिली, जोनासेन, किंग, मॅकग्रा, बेथ मुनी, पेरी, स्कूट, सुदरलँड, वेलिंग्टन.

तिरंगी टी-20 मालिका- 16 जुलै- ऑस्ट्रेलिया वि पाक, 17 जुलै- आयर्लंड वि. ऑस्ट्रेलिया, 21 जुलै-आायर्लंड वि. ऑस्ट्रेलिया, 23 जुलै-पाक वि. ऑस्ट्रेलिया.

राष्ट्रकुल स्पर्धेतील सामने- 29 जुलै- ऑस्ट्रेलिया वि. भारत, 31 जुलै- ऑस्ट्रेलिया वि. बार्बाडोस, 3 ऑगस्ट- ऑस्ट्रेलिया वि.पाक.

Related Stories

दुसऱया कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल

Patil_p

अविनाश साबळे युगांडात ट्रेनिंग घेणार

Patil_p

लखनौ सुपर जायंट्सच्या नव्या जर्सीचे अनावरण

Patil_p

आयपीएलसाठी पर्यायांचा शोध

Patil_p

मुंबईचा हैदराबादवर डावाने विजय

Amit Kulkarni

पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू सना मीरची निवृत्ती

Patil_p