Tarun Bharat

विंडीज टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

Advertisements

वृत्तसंस्था/ मेलबर्न

विंडीजविरुद्ध होणाऱया दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी यजमान ऑस्ट्रेलियाने चार स्टार खेळाडूंना पुन्हा संघात स्थान दिले आहे. पुढील महिन्यात त्यांच्याच देशात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 5 व 7 ऑक्टोबर हे दोन सामने होणार आहेत.

ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनातून हे दोन सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. अलीकडेच त्यांना भारताविरुद्ध झालेल्या मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला असल्याने संघातील त्रुटी भरून काढण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क व अष्टपैलू मिशेल मार्श व मार्कस स्टोइनिस यांना भारताविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती. त्यांचे या संघात पुनरागमन झाले आहे. युवा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनने भारताविरुद्ध चमकदार प्रदर्शन करीत तीन सामन्यात दोन अर्धशतकांसह 118 धावा फटकावल्या, त्यालाही या संघात स्थान देण्यात आले आहे. विश्वचषक संघात त्याला अद्याप स्थान मिळाले नसले तरी विंडीजविरुद्ध दोन सामन्यात त्याने जोम काय ठेवल्यास त्याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकते. केन रिचर्डसन व ऍस्टन ऍगर यांना या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे तर ऍरोन फिंचकडे नेतृत्व कायम राहील.

टी-20 विश्वचषकाचे जेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करणाऱया ऑस्ट्रेलियाची सलामीची लढत 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होईल. त्यांचा गट एकमध्ये समावेश असून याच गटात अफगाणिस्तान व इंग्लंड यांचाही समावेश आहे.

विंडीज मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ ः ऍरोन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, कमिन्स, टिम डेव्हिड, ग्रीन, हॅझलवुड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, स्टार्क, स्टोइनिस, मॅथ्यू वेड, वॉर्नर, ऍडम झाम्पा.

Related Stories

अर्जुन पुरस्कारासाठी रशीद, अदिती, दिक्षाची शिफारस

Patil_p

बांगलादेश मंडळाकडून क्रिकेटपटूंचा आरोप फेटाळला

Patil_p

राजस्थान रॉयल्सच्या फिरकी सल्लागारपदी ईश सोधी

Patil_p

बॉक्सर सरिता देवी कोरोनामुक्त

Patil_p

फिफा वर्ल्डकप पात्रता स्पर्धाही लांबणीवर

tarunbharat

एनडीटीएलला पुन्हा वाडाची मान्यता

Patil_p
error: Content is protected !!