Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती बँकेची सलग सहाव्यांदा व्याजदर वाढ

Advertisements

वृत्तसंस्था/ कॅनबरा

ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती बँकेने मंगळवारी सलग सहाव्या महिन्यात आपला बेंचमार्क व्याजदर वाढवून तो 2.6 टक्के केला आहे. हा मागील नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने रोख दरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली, जी विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा कमी होती. विश्लेषकांनी 0.50 टक्के वाढीची अपेक्षा केली होती. देशातील महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. वास्तविक ऑस्ट्रेलियातील सेंट्रल बँकेने गेल्या चार वेळा 0.5-0.5 टक्क्यांनी व्याजदर वाढवले आहेत. यापूर्वी मे महिन्यात मध्यवर्ती बँकेने दर 0.25 टक्क्यांनी वाढवले होते, ऑगस्ट 2013 नंतरची पहिली वाढ आहे.

अर्थमंत्री जिम चालमर्स म्हणाले, की महागाई आणि बिघडणारी जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आगामी काळात उपाययोजना केल्या जातील.

Related Stories

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बाजारात घसरण

Patil_p

‘झोमॅटो’ला दुसऱया दिवशीही प्रतिसाद

Amit Kulkarni

सेन्सेक्स 355 अंकांनी घसरला

Patil_p

शेअर बाजार किंचित वाढीसह बंद

Patil_p

अरविंद लिमिटेडला झाला तोटा

Patil_p

टोयोटा किर्लोस्कर 2 हजार कोटी गुंतवणार

Patil_p
error: Content is protected !!