वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या सिटी खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या निक किरगॉईसने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना अमेरिकेच्या टिफोईचा पराभव केला.
शनिवारी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात किरगॉईसने टिफोईचा 6-7 (5-7), 7-6(12-10), 6-2 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. शुक्रवारी या स्पर्धेत पावसामुळे काही सामने अर्धवट स्थितीत थांबविण्यात आले होते. त्यामुळे 27 वर्षीय किरगॉईसला दिवसभरात दोन सामने खेळावे लागले. किरगॉईसने पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या ओपेलकाचा 7-6(7-1), 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती. अन्य एका सामन्यात रशियाच्या रुबलेवने अमेरिकेच्या क्रेसीवर 6-4, 7-6(8-6) असा विजय मिळविला. रुबलेवने शुक्रवारच्या आपल्या पहिल्या सामन्यात स्थानिक वुल्फवर 6-2, 6-3 अशी मात केली होती. रुबलेव आणि जपानचा निशीओका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.