कॅनबेरा / वृत्तसंस्था
आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या प्लेईंग किटचे अनावरण करण्यात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ट्वीटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली. ऑस्ट्रेलियात आयोजित टी-20 वर्ल्डकप दि. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
संघातील खेळाडूंचा पोशाख अन्टी फिओना क्लार्क व कर्टनी हॅगन यांनी ऍसिक्सच्या सहकार्याने तयार केला असून याच दोन्ही घटकांनी यापूर्वी देखील संघाच्या काही जर्सी तयार केल्या आहेत. संघाच्या नव्या जर्सीवर ब्लॅक स्लीव्हज व ट्रंकवर ग्रीन-गोल्ड ग्रेडिएंटचा समावेश आहे. ब्लॅक ट्राऊजर्स व ब्लॅक कॅपवर अबोर्जिनल, टोरेस स्ट्रेट आईसलँडर फ्लॅग कोरले गेले असून लाँग स्लीव्ह्ज व्हर्जनवर गोल्ड व ग्रीन आर्टवर्क करण्यात आले आहे.