Tarun Bharat

‘हाउ टू मर्डर युवर हजबंड’ची लेखिका हत्येप्रकरणी दोषी

पतीच्या हत्येचा गुन्हा सिद्ध

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

अमेरिकेत एका लेखिकेला पतीच्या हत्येसाठी दोषी ठरविण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या लेखिकेने लिहिलेल्या कादंबरीचे नाव ‘हाउ टू मर्डर युवर हजबंड’ (स्वतःच्या पतीची हत्या कशी करावी) असे होते. हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या महिलेचे नाव नॅन्सी क्रॅम्प्टन ब्रोफी (71 वर्षे) आहे. 2018 मध्ये नॅन्सी यांनी स्वतःच्या पतीची गोळय़ा झाडून हत्या केली होती. ओरेगन प्रांताच्या न्यायालयाने नॅन्सी यांना याप्रकरणी दोषी ठरविले आहे.

डॅनियल ब्रोफी यांच्यावर दोन गोळय़ा झाडण्यात आल्या होत्या. नॅन्सी यांनी पतीच्या विम्याच्या रकमेसाठी ही हत्या केल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. पतीच्या मृत्यूनंतर विम्यापोटी नॅन्सी यांना सुमारे 11 कोटी रुपये मिळणार होते. नॅन्सी यांनी बंदुकीचे अनेक हिस्से प्राप्त केले होते.

नॅन्सी एक कादंबरी लिहित असून यात एक महिला स्वतःच्या अत्याचार करणाऱया पतीला मारण्यासाठी हळूहळू बंदुकीचे हिस्से जमा करत जात असल्याची पार्श्वभूमी असल्याचा दावा नॅन्सी यांच्या वकिलाने केला होता. डॅनियल ब्रोफी हे ओरेगन कल्नरी इन्स्टीटय़ूटमध्ये 2006 पासून शेफ म्हणून काम करत होते. 2 जून 2018 रोजी किचनमध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या अर्ध्या तासापूर्वी नॅन्सी इन्स्टीटय़ूटमध्ये आल्या होत्या असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते.

Related Stories

पाकिस्तानमध्ये रेल्वे-बस अपघातात 19 शीख भाविकांचा मृत्यू

datta jadhav

चीनमध्ये लॉकडाउन, उपासमारीमुळे लोकांचे हाल

Patil_p

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुनक पिछाडीवर

Patil_p

भारताच्या मदतीसाठी आता अमेरिकन फौजा

datta jadhav

ढाक्यातील बहुमजली इमारतीत विस्फोट, 14 ठार

Patil_p

आफ्रिकेत ‘इबोला’मुळे 4 जणांचा मृत्यू

datta jadhav