दामोदर मावजो यांचे प्रतिपादन
फोंडा : साहित्याच्या विकासासाठी वाचन महत्त्वाचे आहे. लेखकाने चोखंदळपणे वाचन केल्यास त्याची सर्जनशीलता अधिक समृद्ध होईल. लेखकांनी आपल्या लेखनामध्ये जास्तीत जास्त शब्दांचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक दामोदर मावजो यांनी केले. आकाश भालचंद्र गावकर यांनी लिहिलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये नुकताच हा प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पूर्णानंद च्यारी तसेच पुस्तकावर भाष्य करण्यासाठी डॉ. हनुमंत चोपडेकर, भालचंद्र गावकर, लेखक आकाश गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पूर्णानंद च्यारी व डॉ. हनुमंत चोपडेकर यांनी पुस्तकावर आपले विचार मांडले. आकाश गावकर यांनी आपले मनोगत तर भालचंद्र गावकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा पै धुंगट यांनी तर अनिश अग्नी यांनी आभार मानले.