सोशल मीडियावर होतेय व्हायरल
सोशल मीडियावर सध्या सनरूफ असणारी एक ऑटोरिक्षा चर्चेत आहे. चेन्नईत ही विशेष ऑटोरिक्षा दिसून आली आहे. महागडय़ा आणि आलिशान वाहनांमध्येच सनरूफ दिसून येत. परंतु ऑटोरिक्षात सनरूफ पाहताच प्रवाशाने त्याची छायाचित्र काढत सोशल मीडियावर शेअर केले आहे.
सनरूफ असणाऱया ऑटोरिक्षाचे हे छायाचित्र 30 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर प्रसारित झाले आहे. हे छायाचित्र आता सर्वच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. युजर्सनी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चेन्नईत ऑटोरिक्षामध्ये सनरूफचा उपयोग नाही, शहरात वर्षातील बहुतांश काळ उकाडाच असतो असे काही जणांनी म्हटले आहे. तर चेन्नईत ऑटोरिक्षामध्ये इच्छिणारी ही अखेरची गोष्ट असल्याचे एका युजरने नमूद केले आहे. या ऑटोरिक्षाचे छत अन्य रिक्षांपेक्षा वेगळे आहे.