Tarun Bharat

पालयेत 7 रोजी ‘अवघी विठाई माझी’

वार्ताहर /पालये

भंडारवाडा-पालये येथील श्री महापुरुष मंदिरामध्ये बुधवार 7 रोजी सकाळी 10 वाजता सौ व श्री. संदीप दिगंबर बुडके यांच्या यजमानपदाखाली सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद होईल.

संध्याकाळच्या सत्रात 4 वाजता स्थानिक भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम, 7 वा. फळ-फळांची पावणी, रात्री 9 वा. महापुरुष हौशी नाटय़मंडळ भंडारवाडा निर्मित आणि नरेंद्र मधुकर नाईक लिखित संत सावतामाळी यांच्या जीवनावर आधारित ‘अवघी विठाई माझी’ हे नाटक होईल. दिग्दर्शन, साहाय्यक दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन, तबलासाथ, पार्श्वसंगीत, मंजिरीसाथ, पखवाजसाथ आदी बाजू अनुक्रमे सुनिल आसोलकर, प्रेमानंद नाईक, महेश गवंडी, नारायण आसोलकर, तुळशीदास परब, परेश नाईक, प्रसाद परब, सिद्धेश गवंडी यांनी सांभाळलेल्या आहेत. रंगमंचव्यवस्था सोपटे नाटय़भंडार पार्से व ध्वनिसंकलन सुभाष शिरोडकर साऊंड बांदा यांची आहे. सूत्रधार प्रभाकर गडेकर हे आहेत. यात अशोक गवंडी, गुरुदास मोहन च्यारी, रोहन गवंडी, संतोषी भालचंद्र परब, समिया गडेकर, भावेश गवंडी, दत्ताराम पणजीकर, संजय गडेकर, सागर शिरोडकर, आतिश गवंडी, मच्छिंद्र परब, प्रकाश उत्तम परब, प्रेमानंद न्हानजी, लक्ष्मण नाईक, अनिकेत च्यारी, अरूण गवंडी, नंदादीप मांद्रेकर, आदित्य च्यारी, ओंकार गवंडी, आदिनाथ गडेकर यांच्या भूमिका आहेत. कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन महापुरुष राष्ट्रोळी देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.  

Related Stories

’आप’च्या प्रस्तावित योजनेसाठी नोंदणी सुरु

Amit Kulkarni

बेंडवाडा – सांगे येथील पुलाच्या नशिबी रखडणे कायम

Amit Kulkarni

ठरावाची लवकरात लवकर अंबलबजावणी करण्यात येणार

Amit Kulkarni

त्रिसदस्यीय प्रशासक समितीने घेतला गोवा डेअरीचा ताबा

Omkar B

चांगले जगण्यासाठी विनोद आवश्यक

Patil_p

नितीश बेलुरकरला अ. गो. ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद

Amit Kulkarni