Tarun Bharat

डायमंड लीगमध्ये अविनाश साबळेला पाचवे स्थान

रॅबॅट-मोरोक्को / वृत्तसंस्था

भारताच्या अविनाश साबळेने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत 3 हजार मीटर्स स्टीपलचेस इव्हेंटमध्ये स्वतःचाच विक्रम आठव्यांदा मोडला. लष्करी सेवेत कार्यरत असणाऱया 27 वर्षीय साबळेने 8 मिनिटे 12.48 सेकंद वेळ नोंदवत पाचवे स्थान प्राप्त केले. रविवारी रात्री उशिरा संपन्न झालेल्या या इव्हेंटमध्ये त्याने आपलाच मागील राष्ट्रीय विक्रम (8 मिनिटे 16.21 सेकंद) मागे टाकला. हा विक्रम त्याने मार्चमध्ये तिरुवनंतपूरम येथे संपन्न झालेल्या इंडियन ग्रां प्रिमध्ये नोंदवला होता.

रविवारी लोकल हिरो, टोकियो ऑलिम्पिक सुवर्णजेता सौफिन बक्कालीने 7 मिनिटे 58.28 सेकंद वेळेसह सुवर्ण जिंकले तर इथिओपियाच्या टोकियो ऑलिम्पिक रौप्यजेत्या लामेचा गिरमाने 7 मिनिटे 59.24 सेकंद वेळेसह रौप्य पदकाची कमाई केली. त्याचाच राष्ट्रीय सहकारी हैलेमरियमने 8 मिनिटे 6.29 सेकंद वेळेसह कांस्य मिळवले. त्याची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली.

2016 रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन कॉन्सेस्लस किप्रुतोने 8 मिनिटे 12.47 सेकंद वेळेसह चौथे स्थान मिळवले. तो साबळेपेक्षा फक्त सेकंदाच्या एक-शतांश भागाने आघाडीवर राहिला. अविनाश साबळेने या इव्हेंटमध्ये सातत्याने आपली कामगिरी सुधारली असून यामुळे त्याला स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम सातत्याने मोडीत काढण्यासाठी ओळखले जाते. त्याने सर्वप्रथम 2018 मध्ये 8 मिनिटे 29.80 सेकंद वेळेसह गोपाल सैनीचा (8 मिनिटे 30.88 सेकंद) विक्रम मोडीत काढला होता. त्यानंतर सातत्याने तो आपली कामगिरी उंचावत ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

मागील महिन्यात अमेरिकेत संपन्न झालेल्या स्पर्धेत साबळेने पुरुषांच्या 5 हजार मीटर्स स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. त्याने तेथे 13 मिनिटे 25.26 सेकंद अशी वेळ नोंदवली आणि बहादूर प्रसादचा 13 मिनिटे 29.70 सेकंद वेळेचा प्रदीर्घकाळ अबाधित राहिलेला विक्रम मोडीत काढला होता. बहादूर प्रसादने तो विक्रम बर्मिंगहममध्ये 1992 साली नोंदवला होता.

Related Stories

हैदराबाद एफसीशी क्हिक्टर करारबद्ध

Patil_p

‘क्लीन स्वीप’ हा विराटसेनेचा निर्धार

Patil_p

अखेर रुट-बेअरस्टोचे बुलंद इरादे जिंकले !

Patil_p

किदाम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

गंभीरने केले मोलकरणीचे अंत्यसंस्कार

Patil_p

लवलिना बोर्गोहेन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p