राघव शर्माला डेट करतेय नवोदित अभिनेत्री
इंटरनेट सेंसेशन आणि अभिनेत्री अवनीत कौर स्वतःच्या सुपर सिझलिंग लुक्सवरून चर्चेत असते. परंतु यावेळी अवनीत स्वतःच्या लव्ह लाइफवरून चर्चेत आली आहे. अवनीत कौर मागील काही काळापासून निर्माता राघव शर्माला डेट करत असल्याची चर्चा आहे.
अवनीत आणि राघ दोघेही परस्परांना दीर्घकाळापासून ओळखत आहेत. दोघांनाही 3 ते 4 वर्षांपूर्वी परस्परांसाठी असलेल्या प्रेमाची जाणीव झाली होती. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांसोबत आहेत. दोघांनी स्वतःच्या प्रोफेशनमुळे स्वतःचे प्रेमसंबंध जगजाहीर केले नव्हते.
राघव शर्मा एक निर्माता असून म्युझिक लेबल कंपनीशी जोडला गेलेला आहे. या बॅनरशी निगडित अनेक प्रोजेक्ट्समध्ये अवनीत दिसून आली आहे. याचमुळे तो स्वतःच्या डेटिंग लाइफला गुप्त ठेवू इच्छितो. तर अवनीत एक अभिनेत्री असण्यासह एक उत्तम डान्सर देखली आहे. तिने अनेक डान्स रियलिटी शोंमध्ये भाग घेतला आहे. तसेच अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये तिने काम केले आहे. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. दोघेही परस्परांना भेटण्यासाठी मोठा प्रवास करत असतात. अवनीत मुंबईत वास्तव्यास आहे तर राघव दिल्लीत राहतो.