Tarun Bharat

स्वांतत्र्यदिनानिमित्त होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान टाळा

हिंदू जनजागृती समितीचे नागरिकांना आवाहन

प्रतिनिधी /खानापूर

स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळय़ा प्रकारे कळत, नकळत होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी जागृती राखावी तसेच यासंदर्भात विद्यार्थ्यांना विविध शाळा-महाविद्यालयात ऑनलाईनद्वारे प्रबोधन करावे, असे आवाहन खानापूर तालुका हिंदू जनजागरण समितीने केले असून यासंदर्भात विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण खाते तसेच तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

यासंदर्भात हिंदू जनजागरण समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. मात्र दुर्दैवाने याचे स्मरण केवळ 15 ऑगष्ट आणि 26 जानेवारी या दिवशीच बहुतांश भारतीयांना होते. आणि या दिनी राष्ट्रध्वज मोठय़ा अभिमानाने मिरवले जातात. हेच कागदी, प्लास्टिकचे छोटे छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी सायंकाळपासून रस्त्यावर, कचऱयात, गटारीत आदी ठिकाणी पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज तर लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना झालेली पहावी लागते.

देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झालेल्या देशभक्तांनी इंग्रजांचे अत्याचार चालू असताना हातातील राष्ट्रध्वज जमिनीवर पडू नये, यासाठी अनेक लाठय़ा खाल्ल्या, अत्याचार सहन केले. राष्ट्रध्वजाची विटंबना होऊ नये यासाठी क्रांतिकारकांनी प्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले असताना लहान मुलांना खेळण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे, वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले झेंडे रस्त्यावर आणि नंतर कचराकुंडीत पहायला मिळतात. यामुळे हा राष्ट्रध्वजाचा अवमानच होतो.

आजचा विद्यार्थी हा देशाची भावी आधारस्थंभ ही भावी पिढी राष्ट्राभिमानी व्हावी, या उदात्त हेतूने हिंदू जनजागृती समिती गेली 19 वर्षे हा उपक्रम राबवत आहे. मुलांमध्ये राष्ट्रप्रेम, अन् राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, राष्ट्रीय प्रतिकांविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा, या विषयावर व्याख्यान आणि प्रश्नमंजुषा घेणे, राष्ट्रीय प्रतिकांचे महत्त्व सांगणारी पत्रके वाटणे, फ्लेक्स, होर्डिंग लावणे, रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, प्लास्टिकच्या राष्टध्वजांची विक्री रोखण्यासाठी प्रयत्न करणे आदी उपक्रम राबवले जातात.

या निवेदनावर हिंदू जनजागृती समितीचे संभाजी चव्हाण, यशवंत बिरजे, गोविंद चव्हाण, गंगाराम घाडी, विलास बेडरे, नारायण खानापुरी, विष्णू शिवठणकर, राजू चव्हाण व इतरांच्या सहय़ा आहेत.

Related Stories

सर्व ग्रा.पं.वर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा!

Patil_p

अटीतटीच्या लढतीत अरविंद पाटील विजयी

Patil_p

किल्ला खंदकापासून कालव्यांची खोदाई

Amit Kulkarni

अनगोळ येथे मटकाबुकीला अटक

Patil_p

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही रांगोळीचे अस्तित्व कायम

Omkar B

भाऊ कदम-भारत गणेशपुरे 3 रोजी बेळगावात

Amit Kulkarni