Tarun Bharat

आव्हाडांनी अण्णांना दिल्या वाढदिवसाच्या उपरोधिक शुभेच्छा; म्हणाले…

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आण्णांना ट्विटद्वारे उपरोधिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे हे ट्विट आता चर्चैचा विषय बनले आहे.

आव्हाड यांनी आण्णांना शुभेच्छा देताना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “प्रिय अण्णा, आपण लष्करातील माजी सैनिक आहात. त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतू, आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत. त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा”

मागील वर्षीही आव्हाड यांनी अशाच प्रकारे आण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. “प्रिय अण्णा, प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, करोनामुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीनसोबत सीमेवरील तणाव याबद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता.’, असे आव्हाडांनी त्यावेळी ट्विटमध्ये म्हटले होते.

Related Stories

युपी : सोमवारपर्यंत वाढवले लॉकडाऊन!

Rohan_P

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील आरोग्य सेविका कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

कोरोना काळात आत्महत्या करणाऱ्या उद्योजकांची आकडेवारी धक्कादायक

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात आज 208 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Abhijeet Shinde

आंबिल ओढ्यातील कारवाई दुर्दैवी, नितीन राऊत पुणे महापौरांवर कडाडले

Rohan_P

सोलापूर : विठ्ठल मंदिर, तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद; मंदिर समितीने घेतला निर्णय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!