भांगराळे गोंय अस्मिताय संस्थेतर्फे घोषणा : हौशी कोकणी नाटय़स्पर्धेत शांतादुर्गा नाटय़मंडळाचे ‘वन टू का फोर’ प्रथम
प्रतिनिधी /फातोर्डा
मडगावातील भांगराळे गेंय अस्मिताय? संस्थेतर्फे यंदा दिला जाणारा तिसरा ‘भांगराळो गोंयकार पुरस्कार’ नागेश करमली यांना प्राप्त झाला असून दुसरा ‘नित्य युवा’ पुरस्कार स्नेहा सबनीस यांना मिळाला आहे. करमली हे कवी, स्वातंत्र्यसैनिक असून केंद्र सरकारच्या वतीने ताम्रपट देऊन त्यांचा सन्मान झालेला आहे तसेच अनेक संस्थांकडून पुरस्का देऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. त्यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तर सबनीस या अनुवादक आणि लेखक असून गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयात अनुवादक म्हणून त्या कार्यरत आहेत. सध्या कोकणी भाषा मंडळाच्या संयुक्त सचिव म्हणूनही त्या कार्यरत असून अनेक पुस्तकांचा त्यांनी कोकणीत अनुवाद केला आहे.
संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष राजेश प्रभू यांनी ही माहिती दिली. त्यांच्यासमवेत सचिव संदीप प्रभुदेसाई, खजिनदार पंकज नमशीकर, सदस्य उदय गुडे, सुरज कोमरपंत, दिलीप नाईक उपस्थित होते. यावेळी तिसऱया सुमती रामा नाईक स्मरणार्थ उत्सवी हौशी कोकणी नाटय़स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. 25 हौशी नाटय़संस्थानी या स्पर्धेत भाग घेतला. नामदेव शेट, उदय गुडे, सुरज कोमरपंत, प्रसाद पागी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कमलाक्ष रामा नाईक यांनी आपल्या मातोश्री स्व. सुमती नाईक यांच्या नावाने 25 लाखांची मदत दिलेली असून प्रथम पारितोषिक विजेत्याला सुमती रामा नाईक स्मरणार्थ फिरता चषक देण्यात येतो, असे प्रभू यांनी सांगितले.
नाटय़स्पर्धेचा निकाल
उत्कृष्ट नाटक-प्रथम-वन टू का फोर? (शांतादुर्गा नाटय़मंडळ, मासोर्डे, सत्तरी), द्वितीय-तेरा लाख चौसष्ट हजार (श्री विठ्ठल शांतादुर्गा कला मंच, मुर्डी, खांडेपार), तृतीय-कुकमादेवीची दीपमाळ (श्री राधाकृष्ण नाटय़मंडळ, सांखळी). उत्तेजनार्थ-आमी बायलो बिंदास (कला संगम सांस्कृतिक मंडळ, पिळगाव-डिचोली), अक्कलशून्य (राष्ट्रोळी महिला संगम, मयडे-बार्देस), शुभमंगल सावधान (श्री वीर विठ्ठल प्रासादिक नाटय़मंडळ, माड्डीकट्टो-पुंकळ्ळी).
दिग्दर्शन-प्रथम-विनय गावस (वन टू का फोर, शांतादुर्गा नाटय़मंडळ-सत्तरी), द्वितीय-अश्वेश गिमोणकर (आमी बायलो बिंदास, कला संगम सांस्कृतिक मंडळ, पिळगाव). अभिनय-पुरुष-प्रथम- ?गोपाळ गवस (वन टू का फोर), द्वितीय-अभय फुलारी (कुकमादेवीची दीपमाळ). याशिवाय पुढील 11 पुरुष अभिनेत्यांना प्रशस्तीपत्रके घोषित करण्यात आली आहेत-गिरीश केंकरे, रामदास नागेशकर, राजेश भोमकर, विश्वजित सावंत, शुभम काटकर, दत्तेश कोसंबे, मिलिंद म्हाडगुत, दिपेश दळवी, सुरज नाईक, शैलेश शेलार व संजय गावकर.
उत्कृष्ट अभिनय-महिला-प्रथम-संजना काणेकर (कुकमादेवीची दीपमाळ), द्वितीय-अनीषा गवस (वन टू का फोर?). याशिवाय पुढील 13 महिला अभिनेत्रींना प्रशस्तीपत्रके जाहीर करण्यात आली आहेत-अंजली नाईक, प्रशांती च्यारी, यामिनी परवार, अमिता पिळगावकर, आरती गावडे, उर्जिता गवस, श्रेया सतरकर, कविता गावडे, प्रतीक्षा परवार, दिव्या नाईक, आरती नाईक, वैभवी बांदोडकर, शांभवी सालेलकर.
विनोदी भूमिका-प्रथम-रूपेश गावडे (तेरा लाख चौसष्ट हजार), द्वितीय-सनीश नाईक (बाबा जमलें रे), उत्कृष्ट बालकलाकार-गार्गी मणेरीकर (होम स्विट होम), लेखन-अश्विन गावडे (तेरा लाख चौसष्ट हजार), पार्श्वसंगीत-सागर गावस? (वन टू का फोर?), नेपथ्य-चंदन राऊत (अक्कलशून्य), वेशभूषा-श्रीयश काणेकर (कुकमादेवीची दीपमाळ), प्रकाशयोजना-संजय केरकर (तेरा लाख चोसष्ट हजार), उत्कृष्ट कोकणी नांदी-बेताळ देवस्थान, केरी-फोंडा (बाळय़ा बाबू झिंदाबाद), उत्कृष्ट आयोजक-सातेरी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब, म्हावशी-वाळपई (बायलो नट्टा घोव रडटा).