Tarun Bharat

प्रियांका नाईक पर्रीकर यांना पीएचडी प्रदान

प्रतिनिधी / म्हापसा

पीर्ण बार्देश येथील प्रियांका दत्तराज नाईक पर्रीकर यांना म्हैसूर विद्यापीठाची पीएचडी प्रदान करण्यात आली. म्हैसूर विद्यापीठाचे प्रा. डॉ. शंकर जयराम यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी वनस्पतीतून प्रथिने अवगीकरण करून त्यांचा कर्करोग पेशींवर प्रभाव अभ्यासला आहे. या दरम्यान त्यांनी शोधनिबंध छापून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदात प्रस्तुत केले आहेत. त्यांचे शालेय व उच्च माध्यमिक शिक्षण डिचोली येथील अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूल व श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पूर्ण केले आहे.

पदवी व पदव्युत्तर शिक्षण, धेंपे महाविद्यालय व बैंगलोर विद्यापीठात पूर्ण केले असून त्या सध्या धेंपे महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागात असिस्टंट प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्या डॉ. दत्तराज व सौ. शालीनी नाईक पर्रीकर यांच्या कन्या तसेच उद्योजक प्रज्योदत नाईक यांच्या पत्नी आहे. मेणकुरे येथील केशव व सौ. कीर्ती नाईक यांच्या स्नुषा आहेत.

Related Stories

डेन्मार्कच्या ‘इन्टू द डार्कनेस’ चित्रपटाला सुवर्णमयूर

Amit Kulkarni

निकिता नार्वेकर यांची भिरोंडा उपसरपंचपदी बिनविरोध.

Amit Kulkarni

जनकल्याणासाठी कोणाचेही पाय पकडणार

Patil_p

पोलीस भरती घोटाळेबाजावर कारवाई करा

Patil_p

तांत्रिक युगात लोकजागरणाचे कीर्तन देश, काळ परिस्थितीनुसार व्हावे

Amit Kulkarni

नागरी सेवेतील 15 अधिकाऱयांच्या बदल्यांचा आदेश जारी

Patil_p