मराठी भाषिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याची जागृती संपूर्ण तालुक्मयामध्ये करण्यात येत आहे. कंग्राळी खुर्द येथेही परिपत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. यावेळी या आंदोलनामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
कंग्राळी खुर्द गावच्या वेशीमध्ये तालुका म. ए. समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी या आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. सीमाभागामध्ये आम्ही 15 टक्क्मयांपेक्षा अधिक मराठी भाषिक एकत्र आहोत. त्यामुळे अल्पसंख्याक भाषिक कायद्यानुसार आम्हाला मराठी भाषेमध्ये परिपत्रके दिलीच पाहिजेत. मात्र जाणूनबुजून कर्नाटक सरकार कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत आहे. कायदा पायदळी तुडवत आहे. त्यामुळे आपल्या न्याय्य हक्कासाठी आम्ही सर्वजण लढा दिला पाहिजे, असे सांगून मोठय़ा संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, भाऊ पाटील, शेतकरी संघटनेचे नारायण पाटील, बी. डी. मोहनगेकर, जोतिबा पाटील, प्रल्हाद पाटील, केदारी पाटील, मधू कांबळे, एम. वाय. पाटील, परशराम पाटील, शाहीर बाबुराव पाटील, मनोहर पाटील, अण्णू पाटील, डॉ. सुहास पाटील, आनंद पाटील यांच्यासह मराठी भाषिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.